PMC Engineer’s Association | पुणे महापालिकेतील अभियंता संवर्गाची सेवाजेष्ठता यादी चुकीची
| पीएमसी इंजिनियर्स असोसिएशन चा आरोप
| यादी दुरुस्त करून सरळ सेवा भरती रद्द करण्याची मागणी
PMC Engineer’s Association | पुणे महानगरपालिके (Pune Municipal Corporation) मधिल अभियंता संवर्गाची (Engineer Cadre) सेवा जेष्ठता यादी (Seniority List) नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मध्ये कनिष्ठ अभियंता पदासाठीची (Junior Engineer) सेवा जेष्ठता यादी पूर्णपणे चुकीची आहे. असा आरोप पीएमसी इंजिनियर्स असोसिएशन (PMC Engineers Association) ने केला आहे. तसेच अभियंता संवर्गाची सेवा जेष्ठता यादी रुजू दिनांकापासून गृहीत धरून दुरुस्त करण्यात यावी आणि कार्यकारी अभियंता पदासाठी राबविण्यात येणारी सरळ सेवाभरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी. अशी मागणी असोसिएशन कडून महापालिका आयुक्त (PMC Commissioner) यांच्याकडे करण्यात आली आहे. (PMC Engineer’s Association)
असोसिएशन च्या अध्यक्ष मुक्ता मनोहर (Mukta Manohar) यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत नुकतेच पत्र दिले आहे. त्यानुसार कनिष्ठ अभियंता पदाच्या सेवाज्येष्ठता यादीमध्ये महापालिके मध्ये रुजू झाल्याचा दिवस गृहीत न धरता भरती परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांवर सेवा जेष्ठता गृहीत धरली आहे. यामुळे अनेक अभियंत्यांची सेवा जेष्ठता डावलली गेली असून अशा अभियंत्यांवर अन्याय होत आहे. या बाबत अनेक अभियंत्यांनी हरकत नोंदविली आहे. मात्र या हरकतींवर सुनावणी न घेता सदर सेवा जेष्ठता यादी मे. राज्य शासनाकडे पाठविण्यात आली आहे. यापूर्वी कोणतीही सेवा जेष्ठता यादी. राज्य शासनाकडे पाठविण्यात आलेली नाही. मग हिच यादी राज्य शासनाकडे पाठविण्याचे प्रयोजन काय ? असा प्रश्न असोसिएशन ने विचारला आहे. (PMC Pune Employees)
पत्रात पुढे म्हटले आहे कि, त्याच प्रमाणे पुणे महानगरपालिके मध्ये कार्यकारी अभियंता पदावर सरळ सेवा भरतीने अभियंत्यांची नेमणूक करण्यात येणार असल्याच्या बातम्या विविध वर्तमानपत्रां मधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. यामध्ये कार्यकारी अभियंता या पदासाठी पात्र अभियंते नसल्याने सरळ भरती होणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. ही बाबही चुकीची आहे. पुणे महानगरपालिके मध्ये कार्यकारी अभियंता या पदासाठी आवश्यकती पात्रता अभियंते कार्यरत आहेत. या सर्व अभियंत्यांची किमान २० वर्ष सेवा झालेली आहे. यातील अनेक अभियंते दविपदवीधर आहेत. या सर्वांना पुणे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. हे अभियंते अनेक वर्ष बढतीच्या प्रतिक्षेमध्ये आहेत. या अभियंत्यांना डावलून बाहेरून भरती केल्यास त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होणार असून त्यांच्यावर अन्याय होणार आहे. या दोन्ही निर्णयांमुळे अभियंता संवर्गात तीव्र नाराजी पसरली असून सर्व अभियंते आंदोलन करण्याच्या मनःस्थितीत आले आहेत. यामुळे या दोन्ही निर्णयांचा तातडीने फेरविचार करणे आवश्यक आहे.
तरी पुणे महानगरपालिके मधिल अभियंता संवर्गाची सेवा जेष्ठता यादी रुजू दिनांकापासून गृहीत धरून दुरुस्त करण्यात यावी आणि कार्यकारी अभियंता पदासाठी राबविण्यात येणारी सरळ सेवाभरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. (PMC Pune Employees Promotion)
तरी पुणे महानगरपालिके मधिल अभियंता संवर्गाची सेवा जेष्ठता यादी रुजू दिनांकापासून गृहीत धरून दुरुस्त करण्यात यावी आणि कार्यकारी अभियंता पदासाठी राबविण्यात येणारी सरळ सेवाभरती प्रक्रिया रद्द करण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे. (PMC Pune Employees Promotion)
—
News Title | PMC Engineer’s Association | Seniority list of Engineer cadre is incorrect
| Allegation of PMC Engineers Association