PMC Employees Voting | बारामती लोकसभेसाठी मतदान करणाऱ्या पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सवलत | मात्र मतदान करून 11 वाजेपर्यंत महापालिकेत यावे लागणार
| महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे आदेश
PMC Employees Voting – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation (PMC) अधिकारी आणि कर्मचा-यांना मंगळवार रोजी ३५- बारामती लोकसभा (Baramati Loksabha Constituency) अंतर्गत येणारे विधानसभा मतदार संघात नोंद असलेल्या मतदारांना या दिवशी मतदान करणेसाठी सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार अधिकारी / कर्मचा-यांनी मतदान करून सकाळी ११.०० वाजेपर्यंत कार्यालयात उपस्थित रहावे. असे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी जारी केले आहेत. (Pune PMC News)
तसेच सोमवार 13 मे रोजी ३३ – मावळ, ३४- पुणे, ३६- शिरूर लोकसभा अंतर्गत येणारे विधानसभा मतदार संघात मतदान करणेकरिता पुणे महानगरपालिकेची सर्व कार्यालये (अत्यावश्यक सेवा वगळून) या दिवशी बंद राहतील. अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सदर दिवशी दोन तासाची सवलत देण्यात येत आहे. असेही आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र अन्वये पुणे जिल्ह्यातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूका अनुषंगाने मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहिर करणेबाबत कळविण्यात आलेले आहे. या परिपत्रकात लोकसभा मतदार संघात ३५ – बारामती, ३३- मावळ, ३४- पुणे, ३६- शिरूर मंगळवार 7 मे आणि सोमवार 13 मे या मतदानाच्या दिवशी संबंधित लोकसभा मतदार संघात व सदर लोकसभा मतदार संघात असलेल्या विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने महापालिका आयुक्तांनी हे आदेश जारी केले आहेत.