PMC Employees Transfer | पुणे महापालिका कर्मचाऱ्याची मंत्रालयात बदली! | राज्य सरकार अधिकाराचा गैरवापर करत असल्याचा आरोप
PMC Employees Transfer | पुणे महापालिकेत (PMC Pune) काम करणाऱ्या कर्मचाऱ्याची नुकतीच मंत्रालयात बदली करण्यात आली आहे. याबाबत राज्य सरकारनेच महापालिकेला आदेश दिले होते. मात्र या आदेशामुळे राज्य सरकारच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. (PMC Employees Transfer)
महापालिका अधिनियमानुसार महापालिका कर्मचाऱ्यांची बदली समकक्ष महापालिकेत केली जाऊ शकते. पती पत्नी एकत्रीकरण अंतर्गत अशा बदल्या केल्या जातात. मात्र त्यासाठी महापालिका मुख्य सभेची परवानगी घेणे गरजेचे असते. त्यानंतरच अशा बदल्या केल्या जातात. असे असतानाही राज्य सरकारकडून नुकताच महापालिकेला एक आदेश आला होता. सरकारचे कक्ष अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी हे आदेश केले आहेत. कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयात लिपिक टंकलेखक या पदावर काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याची मंत्रालयात बदली करण्याबाबत हा आदेश होता. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी संबंधित कर्मचाऱ्यास कार्यमुक्त केले आहे. (Pune Municipal Corporation)
मात्र राज्य सरकार आपल्या अधिकाराचा गैरवापर करत आहे, असा आरोप या निमित्ताने केला जात आहे. मुख्य सभेसमोर याचे विषयपत्र न आणता बदली करण्यात आली आहे. अशाच पद्धतीने सरकार महापालिकेच्या कुठल्याही कर्मचाऱ्याला मंत्रालयात बोलवून घेईल, अशी शंका आता उपस्थित केली जात आहे. तसेच महापालिका आयुक्त देखील अशा पत्रावर लगेच अमल करतात. मात्र कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती बाबत सरकारचे आदेश होऊनही विषय प्रलंबित ठेवतात, याबाबत उलट सुलट चर्चा केली जात आहे. (PMC Pune News)
——
News Title | PMC Employees Transfer | Transfer of Pune Municipal employee to Ministry! | Allegation of abuse of power by the state government