PMC Employees Time Bound Promotion |  कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नाही ! | विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार

HomeBreaking Newsपुणे

PMC Employees Time Bound Promotion | कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नाही ! | विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार

Ganesh Kumar Mule Sep 26, 2023 5:48 AM

PMC Pune Employees | Sharad Pawar | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांची तक्रार थेट शरद पवार यांच्याकडे!
PMC Employees Union | CHS योजनेबाबत पीएमसी एम्प्लॉईज युनियनच्या महापालिका आयुक्तांकडे विविध मागण्या! 
PMC Employees Union Annual Report | पी .एम.सी एम्प्लॉईज युनियनच्या वार्षिक अहवालचे प्रकाशन! 

PMC Employees Time Bound Promotion |  कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नाही ! | विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार

| महापालिका आयुक्तांचे सर्क्युलर जारी

PMC Employees Time Bound Promotion |  पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (PMC Pune Employees) सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) देण्यात येणाऱ्या कालबद्ध पदोन्नती (Time Bound Promotion Proposal) महापालिका आयुक्त यांच्याकडून चांगला दिलासा देण्यात आला आहे. याबाबतचे सर्क्युलर महापालिका आयुक्तांनी जारी केले आहे. राज्य सरकारच्या अधीन राहून पदोन्नती प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कालबद्ध पदोन्नतीसाठी पदोन्नती समिती समोर प्रस्ताव ठेवण्याची आवश्यकता नसणार आहे. विभाग प्रमुखांना अंतिम मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांना हा चांगलाच दिलासा मानला जात आहे.
 (PMC Employees Time Bound Promotion)

महापालिका कर्मचाऱ्यांना प्रत्यक्षात नोव्हेंबर 2021 ला  वेतन आयोगानुसार वाढीव वेतन देण्यात आले तरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्यात आला नव्हता. याबाबत कर्मचाऱ्यांकडून प्रशासनाकडे पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो लेखा विभागाच्या माध्यमातून अतिरिक्त आयुक्तांसमोर मान्यतेसाठी ठेवला होता. मात्र अतिरिक्त आयुक्तांनी हा विषय प्रलंबित ठेवला होता. यामुळे महापालिकेवर किती आर्थिक भार येईल, याची माहिती सादर करण्याचे आदेश दिले होते. ही माहिती यायला बराच अवधी गेला. त्यानंतर प्रक्रिया सुरु झाली. कर्मचाऱ्यांची माहिती देखील घेतली जाऊ लागली. मात्र पुन्हा एकदा हा प्रस्ताव रखडला. कारण सरकारचे स्पष्टीकरण येईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त(ज) यांनी दिले होते. (Pune Municipal Corporation Employees)

मात्र याबाबत महापालिका कामगार संघटनांनी नुकतीच अतिरिक्त आयुक्तांची भेट घेत पदोन्नती बाबत प्रक्रिया सुरु करण्याची मागणी केली. त्यानुसार प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. सरकारचे मार्गदर्शन येईपर्यंत पदोन्नती बाबतची प्रक्रिया सुरु ठेवण्याचे आदेश देण्यात आले याबाबतचे सर्क्युलर देखील महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून जारी करण्यात आले आहे. यात म्हटले आहे कि, तीन लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेची अंमलबजावणी करताना पदोन्नती समितीची अंतिम मान्यता घेण्यात येत होती. मात्र आता सादर होणाऱ्या प्रस्तावना अंतिम मंजुरीचे अधिकारी संबंधित विभागाच्या खाते प्रमुखांना देण्यात आले आहेत. यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. यामुळे पदोन्नती चा मार्ग मोकळा होणार आहे. शिवाय याचा फायदा सेवानिवृत्त सेवकांना देखील होणार आहे. कारण यामुळे त्यांची प्रलंबित पेन्शन प्रकरणे लवकर मार्गी लागणार आहेत.
याबाबत पुणे महापालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे उदय भट, पीएमसी एम्प्लॉईज युनियन चे अध्यक्ष बजरंग पोखरकर तसेच महापालिका मागासवसर्गीय संघटनेचे अध्यक्ष रुपेश सोनवणे यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.
——
कर्मचाऱ्याच्या कालबद्ध पदोन्नती देण्याबाबत आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. त्यानुसार महापालिका आयुक्तांचे सर्क्युलर जारी झाले आहे. हा कर्मचाऱ्यांना चांगला दिलासा आहे. याबाबत प्रशासनाचे आम्ही आभार मानतो. मात्र आता तात्काळ प्रक्रिया सुरु करून पदोन्नती द्यावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.
बजरंग पोखरकर, अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉईज युनियन. 
——–
———
News Title | PMC Employees Time Bound Promotion | Important news for employees There is no need to submit a proposal before the promotion committee for time-bound promotion! | Final approval authority to Head of Department