PMC Employees Promotion | 25% जागांवर  चतुर्थश्रेणी सेवकांमधून लिपिक टंकलेखक पदावर काही सेवकांचीच बढती का अडवली? | महापालिका कर्मचाऱ्यांचा सवाल

HomeBreaking Newsपुणे

PMC Employees Promotion | 25% जागांवर चतुर्थश्रेणी सेवकांमधून लिपिक टंकलेखक पदावर काही सेवकांचीच बढती का अडवली? | महापालिका कर्मचाऱ्यांचा सवाल

कारभारी वृत्तसेवा Dec 07, 2023 3:21 AM

PMC Employees Promotion | DPC | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक सह विविध  पदांसाठी समितीची बैठक संपन्न 
PMC Superintendent Promotion | पदोन्नती मिळालेल्या 48 अधीक्षकांना अखेर दिली जाणार पदस्थापना | पदस्थापनेची कार्यवाही उद्या केली जाणार
PMC Employees Promotion | After many months of waiting, the PMC employees were finally promoted

PMC Employees Promotion | 25% जागांवर  चतुर्थश्रेणी सेवकांमधून लिपिक टंकलेखक पदावर काही सेवकांचीच बढती का अडवली?

| महापालिका कर्मचाऱ्यांचा सवाल

PMC Employees Promotion | पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) आस्थापनेवर कार्यरत असलेल्या चतुर्थश्रेणी सेवकांना बढतीच्या संधी प्राप्त होणेकरीता लेखनिकी संवर्गातील ‘लिपिक टंकलेखक’ या पदावर पदोन्नतीने नेमणूका देण्याबाबत पुणे महानगरपालिका सेवाप्रवेश नियमावली २०१४ मध्ये तरतूद आहे. मान्य आकृतीबंधानुसार या पदाच्या एकूण जागांपैकी २५ % जागा या विहित शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या चतुर्थश्रेणी मेवकांमधून भरणेबाबत नियमावलीमध्ये तरतूद असून त्यानुसार मनपा प्रशासनाकडून सद्यस्थितीत कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून यातील 50 हून अधिक कर्मचाऱ्यांना बढती पासून वंचित ठेवण्यात आले आहे. पदोन्नती समितीतील काही सदस्यांनी याबाबत नवीन नियम काढत रोस्टर लावण्याची मागणी केली आहे. त्यामुळे बढती प्रलंबित राहिली आहे. त्यामुळे बढती कधी देणार, असा सवाल कर्मचारी विचारत आहेत. (PMC Pune News)

 महाराष्ट्र शासनाने जानेवारी २०१७ मध्ये निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार अनुकंपा तत्वावर मनपा सेवेत रुजू होणाऱ्या सेवकांना लिपिक टंकलेखक या पदावर थेट नियुक्ती देण्यात येते. परंतु या शासन निर्णयापूर्वी महापालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या सेवकांना मात्र पदोन्नतीसाठी १२ ते १५ वर्ष वाट पहावी लागत आहे. महापालिकेच्या सेवेच्या पुरेसा अनुभव व लिपिक पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता असून देखील पदोन्नतीपासून त्यांना वंचित ठेवले जात असल्याने या सेवकांमध्ये अन्याय झाल्याची भावना निर्माण झालेली आहे. (PMC Marathi News)
सामान्य प्रशासन विभागाकडून जानेवारी २०१३ पूर्वी महापालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या व लिपिक टंकलेखक पदासाठी पात्र असलेल्या सेवकांची विभागीय परीक्षा (पेपर क्र.१) घेतली असून त्यामध्ये उत्तीर्ण झालेल्या एकूण सेवकांपैकी ५३ सेवक मागील दोन ते तीन वर्षापासून बडतीच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत महापालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या चतुर्थश्रेणी सेवकांचे पदोन्नतीसाठी अर्ज अद्याप मागविलेले नाहीत त्यामुळे त्यांनतर मनपा सेवेत थेट लिपिक पदावर रुजू झालेले सेवक हे सेवाज्येष्ठ ठरणार असल्याने पुढील पदोन्नतीवर देखील यांचा परिणाम होणार आहे. हे सेवक आपल्याला कधी पदोन्नती मिळेल या प्रतीक्षेत आहेत. (PMC Pune Employees)
मनपा प्रशासनाच्या उदासीनतेमुळे इतकी वर्ष सेवा करून देखील आपल्याला बढतीसाठी अजून किती काळ वाट पहावी लागणार आहे असा प्रश्न या सेवकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिस्थितीचा मनपा प्रशासनाकडून विचार होवून जानेवारी २०१३ पूर्वी महापालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या लिपिक टंकलेखक पदासाठी पात्र ठरलेल्या व विभागीय परीक्षा (पेपर क्र. १) उत्तीर्ण झालेल्या ५३ सेवकांना तात्काळ बढती देणे व यापूर्वी परीक्षेत अनुतीर्ण झालेल्या परीक्षेस काही कारणास्तव अनुपस्थित राहिलेल्या तसेच जानेवारी २०१३ ते डिसेंबर २०१६ या कालावधीत महापालिकेच्या सेवेत रुजू झालेल्या चतुर्थश्रेणी सेवकांचे पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा (पेपर क्र. १) देणेसाठी सेवकांकडून अर्ज मागविणेबाबत कार्यवाही लवकरात लवकर करणेकरीता सामान्य प्रशासन विभागास आदेश व्हावे. अशी मागणी याआधीच पीएमसी एम्प्लॉईज कडून करण्यात आली आहे. (PMC DPC Committee) 

| आमदार रविंद्र धंगेकरांनी घातले लक्ष

दरम्यान या प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील लक्ष घातले आहे. प्रशासनाला पत्र देत बढती देण्याची मागणी धंगेकर यांनी केली आहे. मात्र तरीही याबाबत हालचाल झालेली दिसून येत नाही.

| रोस्टर लावण्याला कर्मचाऱ्यांचा विरोध

दरम्यान या उर्वरित कर्मचाऱ्यांना बढती देण्याबाबत पदोन्नती समिती आता रोस्टर लावण्याबाबत ठाम आहे. समितीतील सदस्यांनी याबाबत मागणी केली होती. यावर समितीचे एकमत झाले आहे. त्यानुसार आता रोस्टर लावले जाणार आहे. मात्र याला कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. याआधीच्या 200 कर्मचाऱ्यांना बढती देताना हा विचार का केला नाही, असा प्रश्न कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. तर प्रशासन म्हणते कि, पहिल्यांदा आमची चूक झाली. आता आम्ही चूक सुधारत आहोत.