PMC Employees Gratuity | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवली! 

Homeadministrative

PMC Employees Gratuity | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवली! 

Ganesh Kumar Mule Dec 21, 2024 7:41 PM

Kasba peth byelection | कसबा पेठ मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज
Prashant Jagtap | Pune Rain | नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवा | प्रशांत जगताप यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
PMC Financial Situation | मिळकत कराची वसूली होईना; जीएसटीचे अनुदान मिळेना | महापालिकेने आर्थिक डोलारा सांभाळायचा कसा?

PMC Employees Gratuity | महापालिका कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवली!

 

PMC Retirement – (The Karbhari News Service) – महापालिका कर्मचाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. सेवानिवृत्ती नंतर दिल्या जाणाऱ्या ग्रॅच्युइटी च्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे. १४ लाखांची मर्यादा आता २० लाख करण्यात आली आहे. याचा फायदा १ सप्टेंबर २०२४ नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे. याबाबतचे आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी (महसूल) जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe PMC) यांनी जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

कोळंबे यांच्या आदेशानुसार पुणे महापालिकेच्या सेवेमधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतनासह निवृत्तीचे अन्य फायदे जसे सेवानिवृत्ती उपदान (Gratuity), निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण असे फायदे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ नुसार देण्यात येतात.

शासन निर्णयान्वये १ जानेवारी  नंतर सेवानिवृत्त / सेवेत मयत होणाऱ्या सेवकास सेवानिवृत्ति उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा १४ लक्ष होती. मात्र शासन निर्णयानुसार १ सप्टेंबर  पासून सेवानिवृत्ति उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा  २० लक्ष करणेत आलेली आहे.

आदेशात म्हटले आहे कि, त्यानुसार ०१ सप्टेंबर  पासून सेवानिवृत्त होणाऱ्या / सेवेत मयत होणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ति उपदान / मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा २० लक्ष विचारात घेऊन उपदानाच्या रकमा अदा करणेकामी ठरावानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) यांची मान्यता प्राप्त झालेली आहे.  त्यानुसार १ सप्टेंबर २०२४ पासून सेवानिवृत्त होणाऱ्या / सेवेत मयत होणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ति उपदान/ मृत्यु उपदानाची कमाल मर्यादा २० लक्ष विचारात घेऊन उपदानाच्या रकमा अदा करणेची कार्यवाही करणेत यावी. सर्व वेतन बील लेखनिक व पेन्शन लिपिक यांनी सदर परिपत्रकानुसार कार्यवाही करावी. असेही आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0