PMC Employees Promotion | महापालिकेच्या तीन कार्यकारी अभियंत्यांना अधिक्षक अभियंता पदावर पदोन्नती!
| शहर सुधारणा समितीची मान्यता
Pune Municipal Corporation – PMC – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (PMC Pune) तीन कार्यकारी अभियंता (स्थापत्य) (PMC Executive Engineer) यांना अधिक्षक अभियंता (स्थापत्य) (PMC Superintendent Engineer) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. या बाबतच्या प्रस्तावाला नुकतीच शहर सुधारणा समितीने (PMC CIC) मान्यता दिली आहे. (Pune PMC News)
पुणे महापालिका सेवा प्रवेश नियमावली नुसार अधिक्षक अभियंता (स्थापत्य) हे पद महापालिका कर्मचाऱ्यांमधून १००% पदोन्नतीने भरले जाते. महापालिकेच्या सुधारित आकृतिबंधानुसार या पदाच्या १२ जागा रिक्त होत्या. यातील ९ पदे आधीच भरण्यात आली होती. त्यामुळे तीन पदे रिक्त राहत होती. जगदीश खानोरे हे मुख्य अभियंता पदासाठी पात्र आहेत. तर अमर शिंदे यांनी ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या होत्या. त्यानुसार पदोन्नती समितीची बैठक घेण्यात आली. यात सेवाज्येष्ठता नुसार ४ कार्यकारी अभियंता पात्र होत होते. मात्र तीन जागा रिक्त असल्याने तिघांची निवड करण्यात आली तर एक प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आला आहे.
पात्र केलेल्या मध्ये विशाल हरिभक्त, श्रीधर कामत आणि अजित बांबळे यांना अधिक्षक अभियंता या पदावर नेमणूक देण्यात आली आहे. नुकताच हा प्रस्ताव शहर सुधारणा समितीने मंजूर केला आहे.
COMMENTS