PMC Employees Promotion | लेखनिकी संवर्गातील पदोत्रतीचे स्तर कमी करण्यास मंजुरी | काही पदांची वेतनश्रेणी वाढवली
PMC Pay Matrix – (The Karbhari News Service) – महानगरपालिका प्रशासनाकडील प्रशासकीय सेवा लेखनिकी संवर्गातील पदोत्रतीचे स्तर कमी करण्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय काही पदांची वेतनश्रेणी देखील सुधारित करण्यात आली आहे. या बाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने मान्यता दिली आहे. आता मुख्य सभेची मान्यता घेऊन हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला जाणार आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महानगरपालिका सेवाप्रवेश (सेवा व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ नुसार प्रशासकीय सेवा लेखनिकी संवर्गातील पदोत्रतीची शिडी व मंजूर पदे ही खालीलप्रमाणे आहे.
उप आयुक्त (मंजूर पदे-१८)
सहाय्यक आयुक्त (मंजूर पदे-२२)
प्रशासन अधिकारी (मंजूर पदे- ७९)
अधिक्षक (मंजूर पदे-८०) T
उप अधिक्षक (मंजूर पदे-२१४)
वरिष्ठ लिपिक (मंजूर पदे- ४८६)
लिपिक टंकलेखक (मंजूर पदे- १४३२)
या पदोत्रती शिडीचे अवलोकन केले असता, प्रशासकीय सेवेत गतिमानता आणणेसाठी व प्रकरणातील विलंब टाळणेसाठी पदोन्नती शिडीमधील काही पदे वरच्या पदामध्ये वर्ग करून पदोन्नती शिडी कमी करणे आवश्यक आहे. तसेच सध्यस्थितीत लिपिक टंकलेखक या पदावर नियुक्ती झाल्यानंतर ३० ते ३५ वर्ष सेवा करुन केवळ उपअधिक्षक किंवा अधिक्षक या पदावर सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे सेवकांना वर्ग-३ च्या पदावर नियुक्ती व वर्ग-३ च्या पदावर सेवानिवृत्ती स्विकारावी लागत आहे. परिणामी एवढ्या प्रदिर्घ सेवेनंतर देखील सेवकांना वर्ग-२ च्या पदावर पदोन्नतीची संधी उपलब्ध होत नाही.
विविध प्रशासकीय विभागात ‘लिपिक’ वा गट-क मधील सर्वात निम्र पदावर नियुक्ती झाल्याअंती प्रशासकीय विभागनिहाय वरिष्ठ पदावर पदोन्नतीसाठीच्या साखळीचे स्तर भिन्न भिन्न असल्यामुळे नियुक्तीनंतर वरिष्ठ पदावरील अधिकारी म्हणून पदोत्रती मिळण्यामध्ये समानता नाही. यास्तव शासकीय कार्यालयातील लिपिक संवर्गास पदोन्नतीचे समान टप्पे निर्माण करावेत, याअनुषंगाने महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाने दिनांक २३ मे २०२२ च्या शासन परिपत्रकानुसार लेखनिकी संवर्गातील पदोती शिडी कमी करणेविषयी प्रस्ताव पाठविणेबाबत कळविले आहे. सदर शासन परिपत्रकात खालीलप्रमाणे बाब नमूद केलेली आहे.
“संवर्ग व्यवस्थापनाच्या दृष्टीने तसेच पदोत्रतीच्या उचित संधी मिळण्याच्या दृष्टीने संबंधित प्रशासकीय विभागांनी त्यांनी कामकाजाची, मनुष्यबळाची आणि प्रशासकीय संरचनेची गरज विचारात घेऊन स्वतंत्रपणे अभ्यासाअंती व सामान्य प्रशासन विभागाशी विचार विनिमय करून गट-क मधील संवर्ग संख्या/पदोन्नतीचे स्तर कमी करण्याबाबत विचार करणे उचित होईल, असे शासनाने गठीत केलेल्या समितीचे मत आहे.”
“उप अधिक्षक, प्रशासकीय सेवा, वर्ग-३ व वरिष्ठ लिपिक, प्रशासकीय सेवा, वर्ग-३”, मध्ये २२/०८/२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सेवाप्रवेश नियमात दुरुस्ती करण्यात आलेली आहे.
नेमणुकीची पद्धत व टक्केवारी
प्रशासकीय सेवा श्रेणी – ३ – प्रशासन अधिकारी – विभाग अधिकारी (आस्थापना), उप लेखापाल, सहा, कर आकारणी व कर संकलन प्रमुख, स्थानिक संस्था कर प्रमुख, मुख्य व्यवस्थापक (सांस्कृतिक केंद्रे). कोठी अधिकारी.. व्यवस्थापक (वस्तीगृह प्रमुख), वरिष्ठ अधिक्षक प्रशासन व लेखा विभाग (शिक्षण मंडळ)
– नामनिर्देशन- २५% – पदोन्नती-७५%
अधिक्षक – कर अधिक्षक, सहाय्यक कोठी अधिकारी, चाळ अधिक्षक, स्थानिक संस्था कर अधिक्षक, अति कोठी अधिकारी उप व्यवस्थापक (सांस्कृतिक केंद्र), रेक्टर, अंतर्गत अर्थान्विक्षक (शि.मं). कार्यालय – पदोन्नती १००%
उप अधिक्षक – कार्यालय अधिक्षक, (परवाना / नाका) सहाय्यक अंतर्गत अर्थान्विक्षक, सहाय्यक प्राप्ती व चाचणीचे अर्थान्विक्षक) – नामनिर्देशन- २५% – पदोन्नती- ७५%
वरिष्ठ लिपिक – (सिनिअर. ग्रे. लेखनिक), दुय्यम लेखापाल (शि.मं). रोखपाल (शि.मं), भांडारपाल (शि.मं) | पदोन्नती १००%
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवेतील पदोन्नतीच्या स्तरास मे. शासन मान्यता प्राप्त असून पुणे महानगरपालिकेची लेखनिकी संवर्गातील पदोन्नती शिडी स्तर हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या लेखनिकी संवर्गातील पदोन्नती शिडीप्रमाणे करणेकरिता पुणे महानगरपालिकेतील गट-क (म्हणजेच वर्ग-३) मधील काही पदे वरच्या संवर्गात समाविष्ट करणे शक्य आहे..
पुणे महानगरपालिकेकडील “बरिष्ठ लिपिक (४८६ पदे) हे पद “उप अधिक्षक (२१४ पदे) या पदामध्ये विलीन करून त्याचे पदनाम “मुख्य लिपिक” (७०० पदे) करणे तसेच अधिक्षक पदाचे पदनाम बदलून कार्यालयीन अधिक्षक असे करणे उचित होईल.
सद्यस्थिती
.
मंजूर पदे
१. प्रशासन अधिकारी – 061
२. अधिक्षक – ८३
३. उप अधिक्षक – २१४
४. वरिष्ठ लिपिक – ४८६
५. लिपिक टंकलेखक – १४७२
सुधारित प्रस्ताव
मंजूर पदे
१. प्रशासन अधिकारी ७०
२. कार्यालयीन अधिक्षक ८३
३. मुख्य लिपिक ७००
४. लिपिक टंकलेखक १४७२
पुणे महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम २०१४ मध्ये २२/०८/२०२३ रोजी केलेल्या सुधारणामध्ये खालील प्रमाणे दुरुस्ती प्रस्तावित करण्यात आली आहे.
प्रशासन अधिकारी – पदोन्नती १००% – (विभाग प्रमुख, सेवकवर्ग विभाग अधिकारी (आस्थापना), उप लेखापाल, सहा. कर आकारणी व कर संकलन प्रमुख, स्थानिक संस्था कर प्रमुख, मुख्य व्यवस्थापक (सांस्कृतिक केंद्रे), कोठी अधिकारी, व्यवस्थापक (वस्तीगृह प्रमुख), वरिष्ठ अधिक्षक प्रशासन व लेखा विभाग (शिक्षण मंडळ)
प्रस्तावित नेमणुकीची अर्हता व नेमणुकीच्या पद्धती
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष अर्हता.
ब) पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे कार्यालयीन अधिक्षक पदावर ३ वर्षाची नियमित सेवा.
प्रशासकीय सेवा श्रेणी – ३ – कार्यालयीन अधिक्षक – पदोन्नती १००% – कर अधिक्षक, सहाय्यक कोठी अधिकारी, चाळ अधिक्षक, स्थानिक संस्था कर अधिक्षक, अति. कोठी अधिकारी, उप व्यवस्थापक (सांस्कृतिक केंद्र), रेक्टर, अंतर्गत अर्थान्विक्षक (शि.मं), कार्यालय अधिक्षक (शि.मं)
अ) पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील मुख्य लिपिक या पदावर ३ वर्षाची नियमित सेवा. ब) विभागीय परीक्षा उत्तीर्ण.
मुख्य लिपिक – पदोन्नती १००%
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष
ब) पुणे महानगरपालिका आस्थापनेवरील सेवाज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणाऱ्या लिपिक- ‘टंकलेखक या पदावर ३ वर्षाची
नियमित सेवा.
क) विभागीय परीक्षा उत्तीर्ण.
पुणे महानगरपालिकेकडील लेखनिकी संवर्गातील प्रचलित व प्रस्तावित सुधारणा वेतनश्रेणी खालीलप्रमाणे :-
प्रशासन अधिकारी – S-15
अधिक्षक – S-14
उप अधिक्षक – S-13
वरिष्ठ लिपिक – S-10
लिपिक टंकलेखक -S-6
—
७ व्या वेतनानुसार वेतनश्रेणी प्रस्तावित सुधारणा
प्रशासन अधिकारी – S-16
कार्यालयीन अधिक्षक – S-15
मुख्य लिपिक – S-14
लिपिक टंकलेखक – S-6
COMMENTS