PMC Employees Promotion | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक पदावर केल्या नियुक्त्या

HomeBreaking Newsपुणे

PMC Employees Promotion | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक पदावर केल्या नियुक्त्या

कारभारी वृत्तसेवा Nov 28, 2023 2:50 PM

PMC Pune Employees Promotion | अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी पदोन्नती | दुरुस्तीच्या प्रस्तावाला मुख्य सभेची मान्यता
PMC Pune Employees Promotion | अधिक्षक, उपअधिक्षक, प्रशासन अधिकारी पदोन्नती | दुरुस्तीचा प्रस्ताव पुणे महापालिकेने पाठवला सरकारकडे!
PMC Pune Employees Promotion | पुणे महापालिकेच्या अधिक्षक, प्रशासन अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा | ‘द कारभारी’ च्या बातमीचा परिणाम

PMC Employees Promotion | बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर अखेर महापालिका कर्मचाऱ्यांना पदोन्नती | प्रशासन अधिकारी, अधिक्षक पदावर केल्या नियुक्त्या

PMC Employees Promotion | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना (Pune Municipal Corporation Employees) प्रशासन अधिकारी (Administration Officer), अधीक्षक (Superintendent) यांना बऱ्याच महिन्याच्या प्रतीक्षेनंतर समाधानाची बातमी मिळाली  आहे. या पदांवर पदोन्नती देण्यासाठी  पदोन्नती समितीची बैठक (DPC) होऊन देखील या कर्मचाऱ्यांची पदोन्नती च्या पदावर नियुक्ती दिली जात नव्हती. अखेर 50 अधिक्षक आणि 13 प्रशासन अधिकारी यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (IAS Ravindra Binwade) यांच्याकडून नुकतेच हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) प्रशासकीय सेवा या संवर्गातील “अधिक्षक” (Superintendent) (वर्ग-३) व “प्रशासन अधिकारी” (Administration Officer) (वर्ग-२), उपअधीक्षक (Deputy Superintendent) , वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) या पदावर तात्पुरती पदोन्नती देण्याबाबतच्या महापालिकेच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. ‘द कारभारी’ वृत्तसंस्थेने हा विषय लावून धरला होता. त्यानुसार प्रशासनाने  पदोन्नतीची प्रक्रिया पुन्हा सुरु केली होती. त्यानुसार पदोन्नती समितीची बैठक आयोजित करून प्रशासन अधिकारी आणि अधिक्षक सह विविध पदांवर पदोन्नत्या देण्यात आल्या होत्या. मात्र बरेच महिने उलटून देखील या कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रे दिली जात नव्हती. अखेर आज संध्याकाळी याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत. 50 अधिक्षक आणि 13 प्रशासन अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे महापालिका कर्मचारी समाधान व्यक्त करत आहेत.

—-

अधीक्षक, प्रशासन अधिकारी यांची तब्बल दीड वर्षा रखडलेली पददोन्नत्ती आज झाली लेट का होईना पण प्रशासनाला जाग आली. लवकरात लवकर वरिष्ठ लिपिक, उपाधीक्षक, अधीक्षक या पदाच्या जागा बऱ्याच दिवसापासून रिक्त आहेत.  त्या साठी सेवकांचे गोपनीय अहवाल मागवून वर्ष झाले आहे. त्याची पण dpc घेऊन सर्व जागा भरून मनपातील मुळ कामगारांना प्राधान्य देण्यात यावे.  तसेच सेवकांच्या रखडलेल्या बदल्या प्रशासनाने लवकरात लवकर कराव्यात. नियुक्ती पत्रे दिल्याबद्दल विक्रम कुमार सर, बिनवडे सर, सचिन इथापे सर यांचं मनपुर्वक आभार.

– बजरंग पोखरकर, अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉईज युनियन.

——

विविध पदांच्या पदोन्नतीसाठी आम्ही महापालिका प्रशासन आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करत होतो. पुणे महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल मा. अतिरिक्त आयुक्त व मा. उपायुक्त सामान्य प्रशासन यांचे मनापासून संघटना आभार मानत आहे.

– रुपेश सोनावणे, अध्यक्ष, पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटना

—–