PMC Employees | सफाई कामगारांच्या वारसांना कनिष्ठ अभियंता होण्याची संधी! | पात्रता पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १५ दिवसात अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन 

Homeadministrative

PMC Employees | सफाई कामगारांच्या वारसांना कनिष्ठ अभियंता होण्याची संधी! | पात्रता पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १५ दिवसात अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन 

Ganesh Kumar Mule Apr 14, 2026 2:20 PM

Palakhi Sohala 2025 | गोखलेनगरच्या मनपा शाळेत पालखी सोहळा उत्साहात संपन्न!
Prasanna Jagtap | विश्रांतीनगर कॅनॉल रोड ते वडगाव चरवड गार्डन या कॅनॉल जवळील ट्रॅकवरील झाडेझुडपे प्रशासन कधी काढणार? | माजी नगरसेवक प्रसन्न जगताप यांचा सवाल
Prajit Nair IAS |  वारसा हक्काने शैक्षणिक पात्रतेनुसार पुणे महापालिकेत पहिल्यांदाच देण्यात आल्या नियुक्त्या | अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांची प्रमुख भूमिका

PMC Employees | सफाई कामगारांच्या वारसांना कनिष्ठ अभियंता होण्याची संधी | पात्रता पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी १५ दिवसात अर्ज करण्याचे प्रशासनाचे आवाहन

 

PMC Employees Promotion – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेमधील लाड/पागे समितीच्या शिफारशीनुसार सेवेतून वयोपरत्वे सेवानिवृत्त / ऐच्छिक सेवानिवृत्त / वैद्यकीय दृष्ट्या अपात्र व मयत या कारणाने सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांच्या पात्र वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार “कनिष्ठ अभियंता, वर्ग-३” या पदावर नियुक्ती देण्यासाठी  प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रशासनाने उपलब्ध माहितीच्या आधारे ही यादी प्रसिद्ध केली आहे. मात्र अजूनही असे काही कर्मचारी आहेत, ज्यांची माहिती प्रशासनाला नाही किंवा ती शोधत बसणे जिकीरीचे आहे. त्यामुळे अशी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अर्ज करून कनिष्ठ अभियंता होण्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडून या बाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका सेवेतून वयोपरत्वे सेवानिवृत्त/ ऐच्छिक सेवानिवृत्त वैद्यकीय दृष्ट्या अपात्र व मयत या कारणाने सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांचे वारस ज्यांना लाड / पागे समितीच्या शिफारशीनुसार घाणभत्ता लागू आहे. सफाई कामगारांच्या वारसा हक्क प्रकरणात नियुक्ती देताना विविध प्रशासकीय विभाग / आस्थापनांना येणान्या अडचणी आणि सफाई कामगारांच्या समस्यांबाबत विविध संघटनांच्या मागण्या विचारात घेऊन, लाड/पागे समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काबाबत यापूर्वी निर्गमित केलेले सर्व शासन निर्णय/परिपत्रके अधिक्रमित करण्यात येवून  शासन निर्णयान्वये सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत सुधारित तरतूद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांनी २०२३ साली याबाबत निर्णय जारी केला होता.

शासन निर्णयान्वये पुणे महानगरपालिकेच्या सेवकांच्या पात्र वारसांनी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत) या पदांवर नेमणूक मिळणेकरिता मागणी अर्ज सादर केले आहेत. असे नियुक्तीचे वारस प्रकरण सामान्य प्रशासन कार्यालयाकडे (आस्थापना विभाग) दाखल झाल्यानंतर  प्रारूप यादी करण्यात आलेली आहे. अजूनही काही सेवक पात्र ठरत आहेत. मात्र अशा कर्मचाऱ्यांची माहिती शोधणे प्रशासनासाठी जिकीरीचे आहे. त्यामुळे आता प्रशासनाने कर्मचाऱ्या कडून अर्ज मागवले आहेत.

प्रशासनाने परिपत्रकात म्हटले आहे कि, तात्पुरती प्रारूप यादीमध्ये घेण्यात आलेल्या नोंदीबाबत काही आक्षेप / चुका असल्यास आगामी  १५ दिवसांच्या मुदतीत आक्षेप  लेखी स्वरुपात कागदपत्रांच्या पुराव्यासहित सामान्य प्रशासन कार्यालय पुणे मनपा येथे कार्यालयीन वेळेत सादर करावे. त्यानुसार  नोंदी घेऊन आक्षेपांची आवश्यकतेनुसार पूर्तता करून अंतिम यादीस मान्यता प्राप्त झाल्यानंतर ती प्रसिद्ध करण्यात येईल. तसेच मुदतीनंतर आलेल्या आक्षेपांचा किंवा अंतिम यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती सुचविण्यात आल्यास त्याची दखल घेतली जाणार नाही. असे देखील प्रशासनाने म्हटले आहे.

दरम्यान हा सरकारचा २०२३ सालचा निर्णय होता. त्यानुसार काही थोड्याच लोकांना कनिष्ठ अभियंता करण्यात आले आहे. बाकी कर्मचारी पात्रता असून देखील वर्ग ४ मध्येच काम करत आहेत. याबाबत प्रशासनाची उदासीनता कारणीभूत मानली जात आहे. मात्र आता या कर्मचाऱ्याना कनिष्ठ अभियंता होण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्वरित अर्ज करणे महत्वाचे आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: