PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | सानुग्रह अनुदान अर्थात बोनस बाबतचे परिपत्रक जारी |  ८.३३% + २३,००० रु. सानुग्रह अनुदान

Homeadministrative

PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | सानुग्रह अनुदान अर्थात बोनस बाबतचे परिपत्रक जारी |  ८.३३% + २३,००० रु. सानुग्रह अनुदान

Ganesh Kumar Mule Oct 07, 2024 8:36 PM

PMC Chief Finance and Account Officer | उल्का कळसकर यांच्याकडील अतिरिक्त पदभार कमी केला! | महापालिका आयुक्तांकडून आदेश जारी
PMC Chief Account and Finance Officer | जितेंद्र कोळंबे यांची प्रतिनियुक्तीवर माजी नगरसेवकांचा आक्षेप 
PMC Chief Account and Finance Officer | जितेंद्र कोळंबे यांची पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी नियुक्ती

PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | सानुग्रह अनुदान अर्थात बोनस बाबतचे परिपत्रक जारी |  ८.३३% + २३,००० रु. सानुग्रह अनुदान

| महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून दिवाळीची लवकर भेट

 

PMC Employees Diwali Bonus – (The Karbhari News Service) – महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Employees and Officers) दिवाळी बोनस (Diwali Bonus) अर्थात सानुग्रह अनुदान आणि बक्षिसी दिली जाते. यंदा कर्मचाऱ्यांना च्या मूळ वेतन + महागाई भत्ता यावर ८.३३%+ २३,००० इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.  वित्त व लेखा विभागाने (PMC Chief Account and Finance Department) बोनस बाबतचे परिपत्रक (Bonus Circular) जारी केले असून सर्व खात्यांना त्यानुसार सूचना केल्या आहेत. १८ ऑक्टोबर पर्यंत सर्व बिले तपासून घेण्यास सांगण्यात आले आहे. या परिपत्रकाने महापालिका कर्मचाऱ्यांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. (PMC Pune Diwali Bonus Circular)

| काय आहे परिपत्रकात?

1. पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) आणि माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना शिक्षण मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना तसेच बालवाडी शिक्षण सेविका, शिक्षक, शिक्षण सेवक २०२३-२४ च्या मुळ वेतन + महागाई भत्ता यावर ८.३३% + २३,००० रु सानुग्रह अनुदान उपस्थितीतिच्या प्रमाणात अदा करण्यात येणार आहे. (Pune Municipal Corporation)

2. ज्या वर्षा करीता सानुग्रह अनुदान द्यावयाचे त्या वर्षांमध्ये संबंधीत सेवकांची (घाण भत्ता देय असणाऱ्या सेवकांसह) कामावरील प्रत्यक्ष हजेरी किमान १८० दिवस असण्याची अट लागू राहील. तथापि फक्त कामावर असताना व काम करित असताना घडलेल्या अपघातामुळे विशेष वैद्यकिय रजा एखाद्या सेवकांस द्यावी लागल्यास अशी रजा मनपा सेवाविनियमाच्यामर्यादित हजेरी धरण्यात येईल.

३. किमान एक वर्ष शासकिय सेवा झालेल्या सेवकांची त्यापुढील आर्थिक वर्षातील हजेरी विचारात घेऊनच सानुग्रह अनुदान देय राहील.

४. २०२३-२४ साठी द्यावयाचे सानुग्रह अनुदानाबाबतच्या अन्य अटी व शर्ती तसेच सेवापुस्तक व वेतन बिलावर ठेवावयाचे दाखले याबाबतचा तपशील दिलेला आहे, त्यानुसार तजवीज करावी. तसेच  संघटना निधीची कपात करण्यात यावी.

५. सर्व पात्र सेवकांना सानुग्रह अनुदान द्यावयाचे असल्याने सदरची बिले ऑडीट विभागातून १८ ऑक्टोबर  अखेर पर्यंत तपासून घ्यावीत. सदरच्या रकमा बँक खात्यातून आदा होणार असल्याने त्याबाबतची आवश्यक ती संगणक प्रणाली (व्हर्जन) सांख्यिकी व संगणक कार्यालयाकडून त्वरीत प्राप्त करून घ्यावी. (PMC Pune)
६. ज्या अधिकारी / सेवकांना सानुग्रह अनुदानातून आयकर व पुरसंचय निधी योजना लागू असलेल्या ज्या सेवकांना पुरसंचय निधीची वर्गणी कपात करावयाची आहे त्यांनी त्याबाबतची पूर्वसुचना संबंधीत बिल लेखनिकांना देणे आवश्यक आहे. वरील प्रमाणे आयकर व पुरसंचय निधी वर्गणी कपात करण्याची सुविधा संगणक प्रणालीमध्ये करण्यात आली आहे.

७. माहे सप्टेंबर २०२४  चे वेतन संबंधीत सेवकास ज्या खात्याकडून देण्यात आले आहे. त्या खात्याने सानुग्रह अनुदान आदा करावयाचे आहे.
तरी, २०२३-२४ या वर्षासाठी सानुग्रह अनुदान आदा करण्याकरीता वरीलप्रमाणे पुर्तता करणेविषयी सर्व खाते प्रमुख यांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व संबंधीत बिल लेखनिकांना जरूर त्या सुचना देण्याची तजवीज करणे. असे ही आदेशात म्हटले आहे.

संघटना निधी असा कापला जाणार

वर्ग 1  अधिकारी – 700 रु

वर्ग 2 अधिकारी – 700 रु

वर्ग 4 मधील सेवक – 400 रु.


  • परिपत्रक येथे पहा

Sanugrah Anudan 2023-24_Circular

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0