PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदाना बाबतचे परिपत्रक जारी |  8.33% + 21000 सानुग्रह अनुदान

HomeBreaking Newsपुणे

PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदाना बाबतचे परिपत्रक जारी | 8.33% + 21000 सानुग्रह अनुदान

Ganesh Kumar Mule Oct 09, 2023 12:47 PM

PMC Contract Employees | Diwali Bonus | कंत्राटी कामगारांना दिवाळी बोनस मिळण्यासाठी लढा तीव्र करणार | कामगार युनियन चा प्रशासनाला इशारा 
DA Hike in January 2024 | जानेवारीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 50% नव्हे तर 51% वर पोहोचेल!
PMPML Employees Diwali Bonus | PMC आणि PCMC प्रमाणे PMPML च्या कर्मचाऱ्यांना मिळणार 8.33% सानुग्रह अनुदान आणि 21000 बक्षीस

PMC Employees Diwali Bonus | पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी सानुग्रह अनुदाना बाबतचे परिपत्रक जारी |  8.33% + 21000 सानुग्रह अनुदान

| महापालिका कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून दिवाळीची लवकर भेट

PMC Employees Diwali Bonus | पुणे |  महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना (PMC Employees and Officers) दिवाळी बोनस (Diwali Bonus) अर्थात सानुग्रह अनुदान आणि बक्षिसी दिली जाते. यंदा कर्मचाऱ्यांना च्या मूळ वेतन + महागाई भत्ता यावर 8.33% + 21,000 इतके सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.  वित्त व लेखा विभागाने (PMC Chief Account and Finance Department) बोनस बाबतचे परिपत्रक (Bonus Circular) जारी केले असून सर्व खात्यांना त्यानुसार सूचना केल्या आहेत. 30 ऑक्टोबर पर्यंत सर्व बिले तपासून घेण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान दरवर्षी दिवाळी तोंडावर आल्यावर परिपत्रक काढले जाते. मात्र यंदा महिनाभर आधीच परिपत्रक काढून प्रशासनाने कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे. (PMC Pune Diwali Bonus Circular)

| काय आहे परिपत्रकात?

1. पुणे महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी सेवक (रोजंदारी कामगारांसह) आणि माध्यमिक व तांत्रिक शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना शिक्षण मंडळाकडील शिक्षक व शिक्षकेतर सेवकांना तसेच बालवाडी शिक्षण सेविका, शिक्षक, शिक्षण सेवक 2022-23 च्या मुळ वेतन + महागाई भत्ता यावर 8.33% + 21000 रु सानुग्रह अनुदान उपस्थितीतिच्या प्रमाणात अदा करायचे आहे. (Pune Municipal Corporation)
2. ज्या वर्षा करीता सानुग्रह अनुदान द्यावयाचे त्या वर्षांमध्ये संबंधीत सेवकांची (घाण भत्ता देय असणाऱ्या सेवकांसह) कामावरील प्रत्यक्ष हजेरी किमान १८० दिवस असण्याची अट लागू राहील. तथापि फक्त कामावर असताना व काम करित असताना घडलेल्या अपघातामुळे विशेष वैद्यकिय रजा एखाद्या सेवकांस द्यावी लागल्यास अशी रजा मनपा सेवाविनियमाच्या
मर्यादित हजेरी धरण्यात येईल.
३. किमान एक वर्ष शासकिय सेवा झालेल्या सेवकांची त्यापुढील आर्थिक वर्षातील हजेरी विचारात घेऊनच सानुग्रह अनुदान देय राहील.
४. 2022-23 साठी द्यावयाचे सानुग्रह अनुदानाबाबतच्या अन्य अटी व शर्ती तसेच सेवापुस्तक व वेतन बिलावर ठेवावयाचे दाखले याबाबतचा तपशील सोबतचे परिशिष्टात दिलेला आहे, त्यानुसार तजवीज करावी. तसेच  संघटना निधीची कपात करण्यात यावी.
५. सर्व पात्र सेवकांना सानुग्रह अनुदान द्यावयाचे असल्याने सदरची बिले ऑडीट विभागातून 30 ऑक्टोबर  अखेर पर्यंत तपासून घ्यावीत. सदरच्या रकमा बँक खात्यातून आदा होणार असल्याने त्याबाबतची आवश्यक ती संगणक प्रणाली (व्हर्जन) सांख्यिकी व संगणक कार्यालयाकडून त्वरीत प्राप्त करून घ्यावी. (PMC Pune)
६. ज्या अधिकारी / सेवकांना सानुग्रह अनुदानातून आयकर व पुरसंचय निधी योजना लागू असलेल्या ज्या सेवकांना पुरसंचय निधीची वर्गणी कपात करावयाची आहे त्यांनी त्याबाबतची पूर्वसुचना संबंधीत बिल लेखनिकांना देणे आवश्यक आहे. वरील प्रमाणे आयकर व पुरसंचय निधी वर्गणी कपात करण्याची सुविधा संगणक प्रणालीमध्ये करण्यात आली आहे.
७. माहे सप्टेंबर 2023  चे वेतन संबंधीत सेवकास ज्या खात्याकडून देण्यात आले आहे. त्या खात्याने सानुग्रह अनुदान आदा करावयाचे आहे.
तरी, 2022-23 या वर्षासाठी सानुग्रह अनुदान आदा करण्याकरीता वरीलप्रमाणे पुर्तता करणेविषयी सर्व खाते प्रमुख यांनी त्यांचे नियंत्रणाखालील सर्व संबंधीत बिल लेखनिकांना जरूर त्या सुचना देण्याची तजवीज करणे. असे ही आदेशात म्हटले आहे.

संघटना निधी असा कापला जाणार

वर्ग 1  अधिकारी – 700 रु
वर्ग 2 अधिकारी – 700 रु
वर्ग 3 अधिकारी व सेवक – 500 रु.
वर्ग 4 मधील सेवक – 400 रु.
—-