PMC Employees | सफाई कर्मचारी असून देखील बिगारी पदनाम दिल्याने घाण भत्त्याचा लाभ मिळेना | प्रशासनाने  समाविष्ट गावातील कर्मचाऱ्यांची मागवली माहिती

Homeadministrative

PMC Employees | सफाई कर्मचारी असून देखील बिगारी पदनाम दिल्याने घाण भत्त्याचा लाभ मिळेना | प्रशासनाने  समाविष्ट गावातील कर्मचाऱ्यांची मागवली माहिती

Ganesh Kumar Mule Nov 01, 2025 6:13 PM

Rahul Gandhi | खा. राहुल गांधींविरुद्धचा निकाल म्हणजे भाजपच्या कपटी षडयंत्राचा भाग – मोहन जोशी
Health Department | PMC Pune | आरोग्य विभागाकडील CSR ची कामे डॉ विद्या नागमोडे यांच्याकडे 
Gliding Center Pune | ग्लायडिंग सेंटर हस्तांतरित करण्याच्या निर्णयाला मानवी साखळी करून विरोध

PMC Employees | सफाई कर्मचारी असून देखील बिगारी पदनाम दिल्याने घाण भत्त्याचा लाभ मिळेना | प्रशासनाने  समाविष्ट गावातील कर्मचाऱ्यांची मागवली माहिती

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेकडे समाविष्ट झालेल्या तत्कालीन ११ व २३ ग्रामपंचायती कडील समावेशन झालेल्या (वर्ग-४) कर्मचाऱ्यांची माहिती सामान्य प्रशासन विभागाने सर्व खात्यांकडून मागवली आहे. कारण गावात सफाई कर्मचारी म्हणून भरती झालेली असताना देखील पुणे महापालिकेत त्यांचे पदनाम बिगारी म्हणून लागू झाले, त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना घाण भत्त्याचा लाभ मिळेनासा झाला. त्यासाठी कामगार युनियन ने या कर्मचाऱ्यांना भत्ता देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने आता अशा सर्व कर्मचाऱ्यांची माहिती मागवली आहे. (PMC General Administration Department)

कामगार  युनियन सोबत झाली बैठक

समाविष्ट झालेल्या तत्कालीन ११ व २३ ग्रामपंचायतीकडील समावेशन झालेल्या कर्मचाऱ्यांचे पैकी (वर्ग-४) मधील ज्या सेवकांच्या सेवापुस्तकात आरोग्य कर्मचारी सफाई सेवक, कचरा बिगारी, गटार बिगारी अशा स्वरूपाची ग्रामपंचायत आस्थापनेकडून नोंद केलेली आहे. परंतू पुणे महानगरपालिकेमध्ये समावेशन करताना त्यांचे पदनाम बिगारी करण्यात आलेले आहे. सदर सेवक पुणे मनपामध्ये सफाई सेवक म्हणून काम करीत असताना देखील त्यांना याकामासाठी देय “घाण भत्ता” दिला जात नाही. या सेवकांना भत्ता देणेबाबत संघटना पदाधिकारी यांनी महापालिका सोबत बैठकीत मागणी केली.

प्रशासनाने १५ दिवसांचा दिला कालावधी

“ग्रामपंचायतीकडील समावेशन झालेल्या कर्मचाऱ्यांचे पैकी (वर्ग-४) मधील ज्या सेवकांच्या सेवापुस्तकात आरोग्य कर्मचारी सफाई सेवक, कचरा बिगारी, गटार बिगारी अशा स्वरूपाची ग्रामपंचायत आस्थापनेकडून नोंद केलेली आहे. परंतू पुणे महानगरपालिकेमध्ये समावेशन करताना त्यांचे पदनाम बिगारी करण्यात आलेले आहे, सद्यस्थितीत सदर सेवक पुणे मनपामध्ये सफाई सेवक म्हणून काम करीत आहेत तथापि त्यांना घाण भत्ता दिला जात नाही.” अशा सर्व सेवकांची माहिती १५ दिवसांच्या मुदतीत सदर करावी. असे आदेश उपायुक्त विजयकुमार थोरात यांनी सर्व खात्यांना दिले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: