PMC Electrical Department | महापालिकेचा विद्युत विभाग का घेणार आहे GRP विद्युत पोल? | स्थायी समितीनेही दिली मान्यता ; जाणून घ्या 

Homeadministrative

PMC Electrical Department | महापालिकेचा विद्युत विभाग का घेणार आहे GRP विद्युत पोल? | स्थायी समितीनेही दिली मान्यता ; जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule Dec 30, 2024 9:12 PM

Gadima | गदिमा स्मारकाचे काम वर्षात पूर्ण करा | पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील
Dehu Alandi Municipal Corporation | देहू, आळंदी मिळून नवीन महानगरपालिका करण्याबाबत चाचपणी | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले संकेत
Ward Structure Changes | प्रभाग रचना बदल | राष्ट्रवादी जाणार सर्वोच्च न्यायालयात

PMC Electrical Department | महापालिकेचा विद्युत विभाग का घेणार आहे GRP विद्युत पोल? | स्थायी समितीनेही दिली मान्यता ; जाणून घ्या

 

PMC GRP Light Pole – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या विद्युत विभागकडून (Pune Municipal Corporation Electrical Department) GRP विद्युत पोल (GRP Light Pole) घेतले जाणार आहेत. याबाबतच्या प्रस्तावाला नुकतीच स्थायी समितीने (PMC Standing Committee) देखील मान्यता दिली आहे. पहिल्या टप्प्यात १६०० पोल घेतले जाणार आहेत. यासाठी ३ कोटी ७४ लाख खर्च येणार आहे. (Pune Municipal Corporation-PMC) 

पुणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या वतीने शहरातील रस्त्यावर विद्युत पोल बसवले जातात. सद्यस्थितीत शहरात २ लाख पोल बसवण्यात आले आहेत. यातील ८०-९० पोल हे GI पोल आहेत. तर काही ठिकाणी FRP पोल बसवण्यात आले आहेत. (Pune PMC News)

आता GRP विद्युत पोल घेतले जाणार आहेत. शहरात काही ठिकाणी GI पोल मुळे शॉक लागून दुर्घटना घडल्या आहेत. वारजे आणि येरवडा परिसरात अशा घटना घडल्या आहेत. त्यात काही लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जीआरपी पोल घेण्याचा प्रस्ताव विद्युत विभागाने ठेवला होता. अशी माहिती विभागाच्या प्रमुख मनीषा शेकटकर यांनी दिली.

शेकटकर यांनी पुढे सांगितले की, या पोलमुळे शॉक लागत नाही. तसेच याला अर्थिंग ची आवश्यकता नसते. शिवाय हे वजनाला देखील हलके असतात. त्यामुळे पोल बसवताना क्रेनची आवश्यकता लागत नाही. असा महापालिकेचा फायदा आहे. शेकटकर यांनी सांगितले कि, GI पोल पेक्षा हे महाग असले तरी नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता GRP पोल महत्वाचे आहेत. समाविष्ट गावे, रहदारीचे ठिकाणे तसेच झोपडपट्टी परिसरात हे विद्युत पोल बसवले जातील. तर GI पोल हे मुख्य रस्त्यावर बसवले जातील. असेही शेकटकर यांनी सांगितले.

EPP Composites pvt ltd या कंपनी कडून ६% अधिक दराने हे १६०० पोल खरेदी केले जाणार आहेत. यासाठी ३ कोटी ७४ लाख इतका खर्च येणार आहे. स्थायी समितीने नुकतीच या प्रस्तावना मान्यता दिली आहे.
—-

पहिल्या टप्प्यात १६०० GRP विद्युत पोल घेतले जाणार आहेत. हे पोल मुख्य करून रहदारीचे रस्ते, समाविष्ट गावे आणि झोपडपट्टी परिसरात बसवले जातील. या प्रस्तावाला मान्यता मिळाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात १६०० GI पोल घेतले जाणार आहेत. हे पोल मुख्य रस्त्यावर बसवले जातील. त्याचा प्रस्ताव लवकरच आणला जाईल.

मनीषा शेकटकर, विभाग प्रमुख, विद्युत विभाग. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0