PMC Election | महापालिका निवडणुकीसाठीचे आरक्षण आणि आरक्षण सोडत बाबतचे वेळापत्रक जाहीर
| राज्य निवडणूक आयोगाने केला सोडतीचा कार्यक्रम निश्चित
Pune PMC Election – (The Karbhari News Service) – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी पूर्वी घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील महापालिकांच्या निवडणुका घेण्याबाबत हालचाली सुरु केल्या आहेत. त्यानुसार प्रभाग रचना अंतिम करण्यात आली आहे. त्यानंतर आता आरक्षण निश्चिती आणि आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आला आहे. बृहन्मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांसाठी हा कार्यक्रम असणार आहे. असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. (Municipal Election News)
अ) प्रारुप आरक्षणास मान्यता घेणे
आरक्षित जागांची संख्या निश्चित करुन त्यास राज्य निवडणूक आयोगाची मान्यता घेण्याकरीता प्रस्ताव सादर करणे – ३० ऑक्टोबर, २०२५ ते ०४ नोव्हेंबर, २०२५
ब) आरक्षण सोडत
आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे – ८ नोव्हेंबर, २०२५
आरक्षणाची सोडत काढून सोडतीचा निकाल राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी सादर करणे. – ११ नोव्हेंबर, २०२५
क) हरकती व सूचना
प्रारुप आरक्षण, हरकती व सूचना मागविण्यासाठी विहित नमुन्यात प्रसिध्द करणे – १७ नोव्हेंबर, २०२५
प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागविण्याचा अंतिम दिनांक – २४ नोव्हेंबर, २०२५
ड) अंतिम आरक्षण
प्रारुप आरक्षणावर प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर विचार करुन संबंधित महानगरपालिका आयुक्त यांनी निर्णय घेणे. – २५ नोव्हेंबर, २०२५ ते १ डिसेंबर, २०२५
आयोगाच्या मान्यतेनंतर अंतिम आरक्षण विहित नमुन्यात शासन राजपत्रात प्रसिध्द करणे – २ डिसेंबर, २०२५


COMMENTS