PMC Election January 2026 | तब्बल ४ वर्षानंतर अस्तित्वात येणार पुणे महापालिकेचे सभागृह!
Pune Municipal Corporation Election – (The Karbhari News Service) – महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेची निवडणूक अखेर जाहीर केली आहे. १५ जानेवारीला निवडणूक होणार आहे. तर १६ जानेवारी ला तत्काळ निकाल जाहीर केला जाणार आहे. दरम्यान आजपासून शहरात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र या निमित्ताने आता पुणे महापालिकेचे सभागृह पुन्हा अस्तित्वात येणार आहे. तब्बल ४ वर्षानंतर या सभागृहात नगरसेवक दिसणार आहेत. सर्वांनाच या निवडणुकीची आतुरता होती. (Pune Corporation General Body)
पुणे महापालिकेची निवडणूक २०१७ साली झाली होती. २०१७ साली अस्तित्वात आलेले सभागृहाचा कालावधी १४ मार्च २०२२ साली समाप्त झाला होता. त्यानंतर आजतागायत निवडणूक झालेली नाही. मात्र आता निवडणूक होणार आहे. १६ जानेवारीचा निकाल झाल्यानंतर लवकरच सभागृह अस्तित्वात येणार आहे. इथे सत्ता कुणाची असणार, हे येणारा काळ ठरवणार आहे. मात्र सभागृह भरण्याची आतुरता मात्र सर्वांनाच लागून राहिलेली आहे. या सभागृहात एकूण १६५ नगरसेवक असतील. त्यात निम्म्याहून अधिक तर महिलाच असणार आहेत.
या निवडणुकीची महापालिका प्रशासन आणि निवडणूक आयोग कडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. इकडे सर्वच पक्षाकडील इच्छुक देखील कंबर कसून तयार आहेत.
| असा असेल पुणे महापालिका निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज भरणे – २३ डिसेंबर
अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० डिसेंबर
उमेदवारी अर्जाची छाननी – ३१ डिसेंबर
अर्ज मागे घेण्याचे मुदत – २ जानेवारी
चिन्ह वाटप – ३ जानेवारी
मतदान – १५ जानेवारी
मतमोजणी – १६ जानेवारी

COMMENTS