PMC E Toilets | ई टाॅयलेट्स साध्या टाॅयलेट्स मध्ये रुपांतरीत करुन नागरीकांना साधी पण स्वच्छ सार्वजनिक टाॅयलेट्स ची सेवा उपलब्ध करून द्या | विवेक वेलणकर यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 

Homeadministrative

PMC E Toilets | ई टाॅयलेट्स साध्या टाॅयलेट्स मध्ये रुपांतरीत करुन नागरीकांना साधी पण स्वच्छ सार्वजनिक टाॅयलेट्स ची सेवा उपलब्ध करून द्या | विवेक वेलणकर यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Apr 15, 2025 3:52 PM

Pune | Canal Advisory committee | शनिवारी कालवा सल्लागार समितीची बैठक! | पाणी नियोजनाबाबत होणार चर्चा
Salary Rules from 1 September | नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! | पगाराचे नवे नियम लागू होणार | टॅक्सचे दरही बदलणार | सर्व काही जाणून घ्या
PMC Health Officer | महापालिका आरोग्य प्रमुख डॉ भगवान पवार यांची 6 महिन्यांत बदली!

PMC E Toilets | ई टाॅयलेट्स साध्या टाॅयलेट्स मध्ये रुपांतरीत करुन नागरीकांना साधी पण स्वच्छ सार्वजनिक टाॅयलेट्स ची सेवा उपलब्ध करून द्या | विवेक वेलणकर यांची महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – दोन कोटी रुपये खर्चून पाच वर्षांपूर्वी पुणे शहरात ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक ई टाॅयलेट्स पैकी बहुसंख्य टाॅयलेट्स बंदच आहेत. असा आरोप सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केला आहे. तसेच ई टाॅयलेट्स साध्या टाॅयलेट्स मध्ये रुपांतरीत करुन नागरीकांना साधी पण स्वच्छ सार्वजनिक टाॅयलेट्स ची सेवा उपलब्ध करून द्या. अशी मागणी महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

वेलणकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार पुणे  शहराचे तत्कालीन खासदार अनिल शिरोळे यांच्या खासदार निधीतून दोन कोटी रुपयांची तरतूद पुणे शहरातील विविध अकरा ठिकाणी अत्याधुनिक ई टाॅयलेट्स बांधण्यासाठी २०१८ मध्ये करण्यात आली होती. महापालिकेने यासाठी इराम सायंटिफिक सोल्युशन्स या कंपनीला ११ ठिकाणी ही ई टाॅयलेट्स बांधण्यासाठी व पुढे एक वर्ष मेंटेनन्स करण्यासाठी २ कोटी रुपयांची ऑर्डर दिली. ही टेक्नॉलॉजी या कंपनीने स्वतः विकसित केली असल्याने अन्य कोणी ती देऊ शकत नसल्याने टेंडर न काढता या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले. कंत्राटाप्रमाणे कंपनीने ही ई टाॅयलेट्स बसवून एक वर्ष मेंटेन ( २०१९ अखेरपर्यंत) केली , मात्र त्यानंतर या कंपनीने महापालिकेला टेक्नॉलॉजी ट्रान्स्फर केली नाही व पुढे मेंटेनन्स कंत्राट घेण्यातही रस दाखवला नाही आणि ही सर्व ई टाॅयलेट्स बंद पडली.

या ई टाॅयलेट्स ची लोकेशन्स होती,
१) रुपाली हाॅटेल समोर २) रामोशी वस्ती ३) हिरवाई गार्डन ४) संभाजी उद्यान ५) माॅडेल काॅलनी , ओम सुपर मार्केट ६) टींगरे गार्डन , विमान नगर ७) निलायम पूल ८) सिंहगड रोड एसटीपी ९) वाडिया महाविद्यालय जवळ १०) तुकाई टेकडी ११) एल एम डी गार्डन, बावधन

शेवटी महापालिकेने नवीन टेंडर काढून अदित्य एंटरप्राईजेस या कंत्राटदाराला प्रायोगिक तत्वावर १.२८.४०० रुपये प्रत्येकी याप्रमाणे यातील ५ टाॅयलेट्स दुरुस्ती साठी व पुढे ७००० रुपये महिना या दराने देखभालीसाठी २०२३ मध्ये कराराने दिली. यासाठी जवळपास पाच लाख रुपये आजवर खर्ची पडूनही या ११ पैकी आज रोजी जेमतेम तीन टाॅयलेट्स चालू स्थितीत आहेत. या संदर्भात खालील प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे. असे वेलणकर यांनी म्हटले आहे.

१) शहरात साध्या पण स्वच्छ सार्वजनिक टाॅयलेट्स ची प्रचंड कमतरता असताना ती मोठ्या प्रमाणावर बांधायची सोडून असली अत्याधुनिक ई टाॅयलेट्स बांधण्यावर प्रचंड पैसा खर्च करण्याची आयडिया येते कुठून ?
२) त्यातही पेटंटेड टेक्नॉलॉजी घेऊन टेंडर प्रक्रियेला खो का घातला जातो ?
३) खासदार निधीतून पैसे मिळाले म्हणजे महापालिकेला तोशीस लागली नाही अशा भंपक मानसिकतेतून हे घडते का ? शेवटी खासदार निधीमध्ये आलेले पैसे जनतेच्या करांच्या पैशातूनच आलेले असतात हे संबंधितांना कधी कळेल ?

——-

 ही सर्व ई टाॅयलेट्स साध्या टाॅयलेट्स मध्ये रुपांतरीत करुन नागरीकांना साधी पण स्वच्छ सार्वजनिक टाॅयलेट्स ची सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश द्यावेत.

विवेक वेलणकर, अध्यक्ष सजग नागरिक मंच, पुणे

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: