PMC Disclosure of specified information | महापालिकेच्या सर्व विभागांची माहिती अद्ययावत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश   | आयुक्तांनी घेतला आढावा

HomeपुणेBreaking News

PMC Disclosure of specified information | महापालिकेच्या सर्व विभागांची माहिती अद्ययावत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश | आयुक्तांनी घेतला आढावा

गणेश मुळे Mar 27, 2024 2:45 AM

Pune Water Cut on Friday | देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवताय, तर त्याचे तपशील जाहीर करा
PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेच्या 7 उपायुक्तांना रात्री 8 ते सकाळी 8 पर्यंत ड्युटी | 11 जुलै पर्यंत करावे लागणार काम 
Pune PMC News | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी | सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांना २५ लाखांचा समूह अपघात विमा! | महापालिका आयुक्तांचा निर्णय

PMC Disclosure of specified information | महापालिकेच्या सर्व विभागांची माहिती अद्ययावत करण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

| आयुक्तांनी घेतला आढावा

Dr Rajendr Bhosale IAS – (The Karbhari News Service ) – महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ६० (अ) मधील विहित तरतुदीनुसार महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation (PMC) विविध विभागांनी नमूद केलेल्या माहितीचे प्रकटीकरण करणे अनिवार्य आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी आढावा घेतला. काही विभागांची माहिती अद्ययावत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही माहिती महापालिका वेबसाईट (PMC Website) आणि सूचना फलकांवर तात्काळ देण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहेत. (PMC Disclosure of specified information)
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ६० (अ) मधील  तरतुदीनुसार महापालिकेतील सर्व विभागांनी त्यांच्या विभागाची माहिती प्रसिध्द करुन सदर माहिती दर तीन महिन्यांनी अद्ययावत करणे बंधनकारक आहे. ही  माहिती सर्व विभागांनी त्यांच्या कार्यालयाच्या सूचनाफलकावर व महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणे आवश्यक आहे. तसेच याबाबत
यापुर्वी देखील वेळोवेळी कार्यालय परिपत्रक प्रसृत करुन पुर्तता करणेबाबत, अवगत करण्यात आले होते. तथापि काही विभागांनी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ६० (अ) अंतर्गत प्रसिध्द केलेली माहिती अद्यापही अद्ययावत केली नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी नुकताच आढावा घेतला. आयुक्तांनी सूचित केले कि ही माहिती वेळच्या वेळी अपडेट केली जावी. त्यानुसार विभाग कामाला लागले आहेत. (Pune PMC News)

नाले सफाईचा कामाचा आयुक्तांनी घेतला आढावा

दरम्यान महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी नाले सफाईच्या कामाचा आढावा घेतला. 15 मे पर्यंत सर्व कामे पूर्ण करण्यास सांगितले आहे. पावसाळ्यात पूर स्थिती उद्भवू नये म्हणून, आपत्ती व्यवस्थापन च्या कामाचा देखील आयुक्तांनी आढावा घेऊन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत.