PMC Deputy Commissioner Transfer | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडे घनकचरा विभाग, संदीप कदम यांच्याकडे मोटार वाहन विभाग तर किशोरी शिंदे यांच्याकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी

Homeadministrative

PMC Deputy Commissioner Transfer | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडे घनकचरा विभाग, संदीप कदम यांच्याकडे मोटार वाहन विभाग तर किशोरी शिंदे यांच्याकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी

Ganesh Kumar Mule Nov 21, 2025 6:45 PM

Pune Property Tax | मिळकतकर कमी करून देतो म्हणून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रकार  | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडून नागरिकांना आवाहन
Pune Property Tax Abhay Yojana | पुणे शहर आणि समाविष्ट गावातील मिळकतधारकांसाठी महत्वाची बातमी | मिळकत कर विभागाची विशेष अभय योजना!
E Waste – Green Byte | शहरातील ई-कचरा (E-Waste) व्यवस्थापन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी “Green Byte” प्रकल्पाचे आयोजन

PMC Deputy Commissioner Transfer | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडे घनकचरा विभाग, संदीप कदम यांच्याकडे मोटार वाहन विभाग तर किशोरी शिंदे यांच्याकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी

| महापालिका आयुक्त यांच्याकडून पुन्हा उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल

Naval Kishore Ram IAS – (The Karbhari News Service) – महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पुन्हा एकदा उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल केला आहे. संदीप कदम यांच्याकडील घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडे दिला आहे. तर उपायुक्त संदीप कदम यांच्याकडे मोटार वाहन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

तसेच उपायुक्त सकपाळ यांच्याकडील पर्यावरण विभाग उपायुक्त किशोरी शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. यासह शिंदे यांच्या कडे आता उपायुक्त विशेष, मुद्रणालय आणि मेडिकल कॉलेज ची जबाबदारी आहे. दरम्यान सकपाळ यांची कर संकलन आणि कर आकारणी विभागातून नुकतीच बदली करण्यात आली होती. तर तिथे उपायुक्त रवी पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान महापालिका आयुक्त उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत वारंवार बदल करत आहेत. याने नेमके काय साध्य होत आहे हे लक्षात येत नाही. मात्र अधिकारी लोक आयुक्तांच्या या भूमिकेने चांगलेच धास्तावले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: