PMC Deputy Commissioner Transfer | पुणे महापालिकेतील तीन उपायुक्तांच्या बदल्या! | राज्य सरकारकडून आदेश जारी

HomeBreaking Newsपुणे

PMC Deputy Commissioner Transfer | पुणे महापालिकेतील तीन उपायुक्तांच्या बदल्या! | राज्य सरकारकडून आदेश जारी

गणेश मुळे Mar 21, 2024 11:59 AM

Ajit Deshmukh : PMC : मिळकतकर विभागाची जबाबदारी उपायुक्त अजित देशमुख यांच्याकडे!  : महापालिका आयुक्तांचे आदेश 
Marathi Language Officer : मराठी भाषेबाबत महापालिकेला “उशिरा सुचलेले शहाणपण”! 
Transfer of three Deputy Commissioners in Pune Municipal Corporation!  

PMC Deputy Commissioner Transfer | पुणे महापालिकेतील तीन उपायुक्तांच्या बदल्या! | राज्य सरकारकडून आदेश जारी

PMC Deputy Commissioner Transfer – (The Karbhari News Service) – राज्य शासनाकडून पुणे महापालिकेतील तीन उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये उपायुक्त चेतना केरुरे, आशा राऊत आणि संतोष वारुळे यांचा समावेश आहे. (Pune Municipal Corporation (PMC)
लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने महापालिका मधील आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदल्यांचा धडाका लावला आहे. नुकतेच पुणे महापालिकेतील आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या. उपायुक्तांच्या देखील बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अजून काही उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
 आज सरकारने तीन उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. यातील दोन अधिकारी हे महापालिकेत प्रतिनियुक्तीने आले होते. यामध्ये उपायुक्त चेतना केरुरे, आशा राऊत आणि संतोष वारुळे यांचा समावेश आहे. दरम्यान या तिघांच्या बदल्या करण्यात आल्या; मात्र त्यांची अजून पदस्थापना केलेली नाही. याबाबत स्वतंत्रपणे आदेश जारी केले जाणार आहेत. असे सरकार कडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान उपायुक्त आशा राऊत यांना नुकताच कालावधी वाढवुन देण्यात आला होता. तसे आदेश देखील सरकारने जारी केले होते. त्यांनंतर थोड्याच दिवसांत बदलीचे आदेश आले आहेत. अजित देशमुख यांना देखील असाच कालावधी वाढवून देऊन पुन्हा तात्काळ बदली करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.