PMC Deputy Commissioner | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे कर आकारणी तर महेश पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार!

HomeपुणेBreaking News

PMC Deputy Commissioner | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे कर आकारणी तर महेश पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार!

गणेश मुळे Feb 19, 2024 8:10 AM

Property Tax Recovery | PMC Pune | मिळकतकर विभागाने एका दिवसात केली ३५ कोटीची वसुली | आतापर्यंत १२८५ कोटी मिळाले
Meditations | Shri Shivkripanand Swami | योग द्वारेच ‘वसुधैव कुटुम्बकम” ची परिकल्पना साकार होणे संभव | परम पूज्य श्री शिवकृपानंद स्वामीजी
Deputy Commissioner Pratibha Patil has the additional charge of PMC Chief Security Officer!

PMC Deputy Commissioner | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे कर आकारणी तर महेश पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार!

PMC Deputy Commissioner  | पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) प्रतिनियुक्ती (Deputation) वर आलेले सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे (Sachin Ithape) आणि कर संकलन व कर आकारणी विभागाचे प्रमुख तथा उपायुक्त अजित देशमुख (Ajit Deshmukh) यांची सरकारकडून बदली करण्यात आली आहे. या जागा रिक्त झाल्याने याचा पदभार इतर अधिकाऱ्याकडे देण्यात आला आहे. त्यानुसार उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांच्याकडे कर आकारणी व कर संकलन (PMC Property Tax Department) तर महेश पाटील (Mahesh Patil PMC) यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा (PMC General Administration Department) अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाकडून हे आदेश आजच जारी करण्यात आले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
राज्य सरकारच्या वतीने लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. यामध्ये राज्यातील 41 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात पुणे महापालिकेत असणाऱ्या देशमुख व इथापे दोघांचा समावेश होता. या दोघांच्या प्रतिनियुक्तीच्या सेवा संपुष्ठात आणल्या आहेत. सचिन इथापे यांची सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर इथे उपविभागीय अधिकारी या रिक्त पदावर नियुक्त करण्यात आले आहे. तर अजित देशमुख यांना उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मुंबई शहर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. (Pune PMC News)

दरम्यान ही दोन्ही पदे रिक्त झाल्याने याचा अतिरिक्त पदभार इतर अधिकाऱ्यांकडे देण्यात आला आहे. त्यानुसार उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे कर आकारणी व कर संकलन तर महेश पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाकडून हे आदेश आजच जारी करण्यात आले आहेत. जगताप यांच्याकडे सद्यस्थितीत अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागाची जबाबदारी आहे. तर महेश पाटील यांच्याकडे मालमत्ता व्यवस्थापन विभाग व दक्षता विभागाची जबाबदारी आहे.

Pmc circular