PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल! | माधव जगताप यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन विभाग संदीप खलाटे यांच्याकडे!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत नुकतेच प्रति नियुक्तीवर काही अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यानुसार महापालिका आयुक्तांनी या सर्व उप आयुक्त यांना विविध विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र यात पुन्हा बदल करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे परिमंडळ १ आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज माधव जगताप यांच्याकडून काढून घेत ते उपायुक्त संदीप खलाटे यांच्याकडे देण्यात आले आहे. जयंत भोसेकर यांच्याकडील समाज कल्याण विभागाची जबाबदारी अरविंद माळी यांना देण्यात आली आहे. माळी यांच्या कडील प्रशिक्षण प्रबोधिनी चे कामकाज भोसेकर यांना देण्यात आले आहे.
COMMENTS