PMC City Engineer Office | अनधिकृत प्लॉटिंग वरून महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाचे नागरिकांना आवाहन
Pune PMC News – (The Karbhari News Service) – कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी येथील अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामा वरून महापालिकेच्या शहर अभियंता कार्यालयाने नागरिकांना आवाहन केले आहे. (Pune News)
शहर अभियंता कार्यालयाच्या निवेदन नुसार, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी, ता. हवेली, जि. पुणे येथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत प्लॉटिंग (भूखंड), जमीन विकसन करून प्लॉटची बेकायदेशीर विक्री केली जात असलेचे निदर्शनास आले आहे. अनधिकृत प्लॉटिंग हिलटॉप / हिलस्लोप आरक्षित जागेवर असल्याने अनधिकृत प्लॉटिंग, अनधिकृत बांधकाम इत्यादींवर बांधकाम विकास विभाग, पुणे महानगरपालिका मार्फत वेळोवेळी कारवाई करण्यात येते. तरी नागरिकांनी कोणत्याही अनधिकृत प्लॉटिंगची खरेदी करू नये व त्यामुळे भविष्यात होणारी आपली फसवणूक टाळण्याची खबरदारी घ्यावी. असे जाहीर निवेदनात म्हटले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

COMMENTS