PMC City Engineer | समाविष्ट  ३२ गावातील नवीन बांधकाम प्रकल्पांना मुबलक पाणी देण्याची जबाबदारी  बिल्डरचीच | खरेदी करारनाम्यामध्ये याचा उल्लेख करावा लागणार 

Homeadministrative

PMC City Engineer | समाविष्ट  ३२ गावातील नवीन बांधकाम प्रकल्पांना मुबलक पाणी देण्याची जबाबदारी  बिल्डरचीच | खरेदी करारनाम्यामध्ये याचा उल्लेख करावा लागणार 

Ganesh Kumar Mule Mar 28, 2026 8:59 PM

Sinhgadh Road Flyover | सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलासाठी 10 कोटींचे वर्गीकरण | आतापर्यंत 44 पिअरचे काम पूर्ण
Pune Fire || अग्निशमन दलाकडे सायंकाळी आगीच्या तीन घटना 
Chief Fire Officer | मुख्य अग्निशमन अधिकारी यांचा अतिरिक्त पदभार गणेश सोनुने यांच्याकडे 

PMC City Engineer | समाविष्ट  ३२ गावातील नवीन बांधकाम प्रकल्पांना मुबलक पाणी देण्याची जबाबदारी  बिल्डरचीच! | खरेदी करारनाम्यामध्ये याचा उल्लेख करावा लागणार

मान्य प्रस्तावांची यादी वेबसाईट वर टाकण्यात येणार

 

 

PMC Merged Villages Water Supply – (The Karbhari News Service) – समाविष्ट  ३२ गावातील नवीन प्रकल्पांना मुबलक पाणी देण्याची जबाबदारी  बिल्डरचीच आहे. तसे हमीपत्र देखील बिल्डर देतात. मात्र प्रत्यक्षांत पाणीपुरवठा करत नाहीत. त्यामुळे मुबलक पाणी देण्याबाबत बिल्डरला खरेदी  करारनाम्यात  ही बाब नमूद करावी लागणार आहे. तसेच मान्य प्रस्तावांची यादी महापालिका वेबसाईट वर टाकण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी जारी केले आहेत. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये नविन ११ गावे (उरुळी देवाची व फुरसुंगी वगळून ९ गावे) व  २३ गावे असे एकूण ३२ गावे समाविष्ट  करण्यात आली आहेत. नव्याने समाविष्ठ गावांकरीता पाणीपुरवठा व्यवस्थेबाबत पुणे महानगरपालिकेमार्फत संपूर्ण पाणीपुरवठा योजना विकसित करण्याची कामे प्रगती पथावर आहेत. नव्याने समाविष्ठ ३२ गावांमधील प्राप्त विकसन व बांधकाम प्रस्तावांमध्ये विकासकामार्फत संबंधित प्रकल्पाचे विकसन पूर्ण झाले नंतर निवासी/व्यापारी वापरासाठी पुणे मनपामार्फत पुरेसा पाणी पुरवठा पुरेशा दाबाने उपलब्ध होईल तोपर्यंत विकासकामार्फत मुबलक पाणीपुरवठा सदर प्रकल्पास करणार असे हमीपत्र विकसक पुणे महानगरपालिकेस सादर करतात.

हमीपत्रानुसार पुणे मनपामार्फत कोणताही पाणीपुरवठा न झाल्यास किंवा अपुरा पाणीपुरवठा झाल्यास सदर प्रकल्पातील सदनिका धारकांना सदनिका खरेदी करारनाम्यामध्ये पाणीपुरवठ्याबाबत वरील प्रमाणे सर्व वस्तुस्थिती विशेष बाब महणून नमूद करून घेण्याची जबाबदारी विकासकाची आहे. तसेच  ३२ गावांमधील पुणे मनपास  हमीपत्र सादर करून विकासकामार्फत प्राप्त विकसन व बांधकाम प्रस्तावांना देण्यात आलेल्या मान्य प्रस्तावांची यादी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत असून वेळोवेळी सदर यादी अद्ययावत करण्यात येणार आहे. शहर अभियंता यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: