PMC CHS Health Scheme | अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या औषध बिलांबाबत आरोग्य विभागाकडून नवीन नियमावली

HomeपुणेBreaking News

PMC CHS Health Scheme | अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या औषध बिलांबाबत आरोग्य विभागाकडून नवीन नियमावली

गणेश मुळे Mar 02, 2024 3:29 AM

Dr Bhagwan Pawar Suspension | पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुख म्हणून डॉ भगवान पवार यांचे निलंबन! | राज्य सरकारकडून कारवाई 
  Polio vaccination campaign will continue till March 9 in Pune Municipal Corporation jurisdiction
PMC Health Department | कायाकल्प प्रकल्पात पुणे महानगरपलिका सर्वोत्कृष्ट

PMC CHS Health Scheme | अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेच्या औषध बिलांबाबत आरोग्य विभागाकडून नवीन नियमावली

बिलांच्या कामात येणार सोयिस्करपणा

PMC CHS Health Scheme – (The Karbhari Online) : पुणे महानगरपालिका सेवक, सेवानिवृत्त सेवक,  आजी-माजी नगरसेवक यांचेसाठी अशंदायी वैद्यकीय सहाय्य योजना (PMC CHS) राबविणेत येते. मात्र योजनेत समाविष्ट सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे काही कर्मचाऱ्यांची गैरसोय होते. ही गैरसोय टाळण्यासाठी आरोग्य विभागाकडून नवीन नियमावली सर्व खात्यासाठी लागू करण्यात आली आहे. त्यानुसार अमल करण्याचे आदेश आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार (Dr Bhagwan Pawar PMC) आणि सहायक आरोग्य अधिकारी डॉ मनीषा नाईक (Dr Manisha Naik PMC) यांनी दिले आहेत. (PMC Health Department)

आरोग्य विभागाचे अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना विभागाकडे अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेअंतर्गत सेवकांची वैयक्तीक उपचार खर्चाची बीले संबंधीत सेवक/सेवानिवृत्त सेवक यांचेकडून सादर करणे, नवीन सभासद नोंदणी कार्ड काढणे, कार्डमध्ये कुटुंब सदस्यांची नांवे समाविष्ठ करणे, यापुर्वी दाखल केलेल्या वैद्यकीय प्रतिपुर्ती बीलांमधील अपुर्ण कागदपत्रांची पुर्तता करुन घेणे इत्यादीबाबत दैनंदिन कामकाज सुरु असते. योजना सभासदांची संख्या मोठी त्यामध्ये असून नुकत्याच समाविष्ट झालेल्या २३ ग्रामपंचायतींकडून मनपा आस्थापनेवर समाविष्ट  झालेल्या सेवकांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.

ही  कामे करुन घेणेसाठी तसेच योजनेच्या सभासदांनी विभागाकडे यापुर्वी दाखल केलेल्या बीलाच्या प्रतिपुर्तीबाबत चौकशी करणे यासाठी संबंधीत सेवक/सेवानिवृत्त सेवक, त्यांचे नातेवाईक यांची दररोज मोठया प्रमाणात अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना विभागाकडे ये-जा सुरु असते. सद्यस्थितीत अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना विभागाचे कामकाज अत्यंत तोकड्या कर्मचारी वर्गावर सुरु असून यामुळे दैनंदिन कामकाज करतांना सदर विभागात ताण-तणाव व प्रसंगी वादाचे प्रसंग उद्भवत असतात. त्यामुळे दैनंदिन कामकाज विस्कळीत होऊन मनपा सेवकांची कामे होणेस वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. योजना सभासदांची सततची वर्दळ थांबविणे, कमी करणे शक्य झाल्यास उर्वरीत दिवसाचे कामात वैद्यकीय प्रतिपुर्ती बीलांची तपासणी करणे, बीलांचे अंतीम मान्यतेसंबंधीत पुढील कामकाज करणे विभागातील कर्मचा-यांस सोयिस्कर होईल व त्यामुळे सभासदांच्या बील पुर्तता व अन्य कामे लवकर होणेस मदत होणार आहे. वरील बाबींमुळे दैनंदिन कामकाजात अंशत बदल करणे आवश्यक झाला आहे.

: अशी असेल नवीन नियमावली

1. पुणे महानगरपालिकेकडील सेवक व सेवानिवृत्त सेवक यांनी त्यांची वैयक्तीक वैद्यकीय प्रतिपुर्तीची बीले प्रत्येक महिन्याच्या १ ते १५ तारखेपर्यंत अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना विभागाकडे सादर करावीत.

2. नवीन सभासद कार्ड काढणे, कार्डमध्ये नवीन नाव समाविष्ठ करणे व तदनुषंगीक कामे करुन घेणेसाठी सकाळी १० ते २ वाजेपर्यंत सभासदांनी अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजना कार्यालयाशी संपर्क साधावा.