PMC Chief Auditor | मुख्य लेखा परीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार जितेंद्र कोळंबे यांच्याकडे! | महापालिका आयुक्तांचे आदेश
PMC Chief Auditor – (The Karbhari News Service) – महापालिकेचे मुख्य लेखा परीक्षक तथा सह महापालिका आयुक्त अंबरीष गालिंदे (Ambrish Galinde PMC) हे सेवानिवृत्त झाले आहेत. हे पद रिक्त झाल्याने या पदाचा अतिरिक्त पदभार हा पुणे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (PMC Chief Finance Officer) जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe PMC? यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation (PMC)
ही देखील बातमी वाचा : पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe) यांची नियुक्ती
पुणे महापालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी पदी (PMC Chief Finance and Account Officer) राज्य सरकारकडून जितेंद्र कोळंबे (Jitendra Kolambe) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेत बऱ्याच दिवसापासून रिक्त असलेले हे पद भरण्यात आले आहे. दरम्यान यामुळे मात्र मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांच्याकडील पदभार कमी केला आहे. कळसकर यांच्याकडे फक्त खर्च ची जबाबदारी आहे तर कोळंबे यांच्याकडे महसूल ची जबाबदारी आहे. (PMC Chief Finance and Account Office)
ही देखील बातमी वाचा : जितेंद्र कोळंबे यांच्या प्रतिनियुक्तीवर माजी नगरसेवकांचा आक्षेप
कोळंबे हे महापालिका सेवेत प्रतिनियुक्तीने आले आहेत. याआधी कोळंबे महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे इथे वित्त व लेखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. वित्त व लेखा संचालक संवर्गात त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना सुधारित पदस्थापना देण्यात आली आहे.
दरम्यान कोळंबे यांच्याकडे आता मुख्य लेखा परीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार असणार आहे. 1 जुलै पासून हे प्रभारी कामकाज त्यांच्याकडे असणार आहे.
ही देखील बातमी वाचा : मुख्य लेखा व वित्त अधिकारी उल्का कळसकर यांच्याकडील पदभार कमी केला
| मुख्य लेखा परीक्षक पदी शासनाचाच अधिकारी बसणार का?
दरम्यान अंबरीष गालिंदे यांच्या सेवानिवृत्तीने मुख्य लेखा परीक्षक तथा सह महापालिका आयुक्त हे पद रिक्त झाले आहे. या पदावर महापालिकेचा कुणी अधिकारी बसणार कि राज्य सरकारचा अधिकारी इथे येणार, याबाबत आता उत्सुकता लागून राहिली आहे.