PMC Chawl Department | पुणे महानगरपालिकेच्या वसाहतीमध्ये निवासस्थान (घर) मिळण्यासाठी इच्छुक महापालिका कर्मचारी करू शकतात अर्ज

Homeadministrative

PMC Chawl Department | पुणे महानगरपालिकेच्या वसाहतीमध्ये निवासस्थान (घर) मिळण्यासाठी इच्छुक महापालिका कर्मचारी करू शकतात अर्ज

Ganesh Kumar Mule Mar 24, 2025 8:20 AM

Deenanath Mangeshkar Hospital | महापालिकेकडून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयास दिलेल्या सर्व  सवलती रद्द करण्याची मागणी 
Local body election| पालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन
Action against unauthorized furniture showrooms | एक्स्प्रेस हायवे वरील अनधिकृत फर्निचर शोरूम आणि हॉटेल्स वर कारवाई

PMC Chawl Department | पुणे महानगरपालिकेच्या वसाहतीमध्ये निवासस्थान (घर) मिळण्यासाठी इच्छुक महापालिका कर्मचारी करू शकतात अर्ज

| चाळ विभागाने मागवले अर्ज

 

Pune Municipal Corporation – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या मनपा वसाहत व्यवस्थापन विभाग अर्थात चाळ विभाग (Pune Municipal Corporation Chawl Department) अंतर्गत पुगे मनपाच्या वर्ग १ ते ४ मधील कार्यरत सेवकांना (PMC Employees) उपलब्ध सदनिकांचे (PMC Colony) वाटप केले जाते. त्यानुसार हे वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक महापालिका कर्मचाऱ्यांकडून चाळ विभागाने अर्ज मागवले आहेत. उपायुक्त राजीव नंदकर (Rajiv Nandkar PMC) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिकेच्या मनपा वसाहत व्यवस्थापन विभाग (चाळ विभाग) अंतर्गत पुगे मनपाच्या वर्ग १ ते ४ मधील कार्यरत सेवकांना उपलब्ध सदनिकांचे “पुणे महानगरपालिका सेवकांना वाटप करावयाचे निवासस्थान उपविधी – २०११ नुसार वाटप केले जाते. कर्मचाऱ्यांनी सदनिका मिळण्यासाठी अर्ज करायचा आहे. त्यासाठी विभागाने अर्जाचा नमुना उपलब्ध करून दिला आहे. तसेच अर्ज हा आपल्या खात्यामार्फत पाठविण्यात यावा, असे आदेशात म्हटले आहे. (Pune PMC News)

अर्ज सादर करताना संबंधित कर्मचाऱ्याचे नाव, महापालिकेत नेमणूक झाल्याचा दिनांक, सेवक कोड क्रमांक, सेवानिवृत्त होण्याचा दिनांक, पदाचे नाव, कार्यरत असणाऱ्या खात्याचे नाव, मोबाईल नंबर, राहण्याचे ठिकाण आणि ज्या वसाहतीत घर हवे ते ठिकाण, अशा सगळ्या गोष्टी नमूद करायच्या आहेत.