PMC Budget By IAS Vikram Kumar | अंदाजपत्रकातील महापालिका आयुक्तांनी केलेलं निवेदन | पुणे शहराविषयी आयुक्तांना काय वाटते? वाचा सविस्तर

HomeBreaking Newsपुणे

PMC Budget By IAS Vikram Kumar | अंदाजपत्रकातील महापालिका आयुक्तांनी केलेलं निवेदन | पुणे शहराविषयी आयुक्तांना काय वाटते? वाचा सविस्तर

गणेश मुळे Mar 07, 2024 2:54 PM

IAS Vikram Kumar | PMC Contract Employees | कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांबाबत पुणे महापालिका सकारात्मक | मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी दिला विश्वास
PMC Environment Report 2022-23 | पीएमपीच्या सीएनजी व इलेक्ट्रिक बस मुळे पुणे शहराच्या वायू आणि ध्वनी प्रदूषणात घट
Pune Municipal Corporation | आशा राऊत यांच्याकडे परिमंडळ तीन च्या उपायुक्त पदाची जबाबदारी | राजीव नंदकर यांच्याकडील मोटार वाहन विभागाचा कार्यभार काढून घेतला

PMC Budget By IAS Vikram Kumar | अंदाजपत्रकातील महापालिका आयुक्तांनी केलेलं निवेदन | पुणे शहराविषयी आयुक्तांना काय वाटते? वाचा सविस्तर

Pune – (The Karbhari News Service) – PMC Budget by IAS Vikram Kumar | पुणे महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (IAS Vikram Kumar) यांनी आज महापालिकेचे आर्थिक वर्ष 2024-25 साठीचा अर्थसंकल्प (PMC Budget 2024-25) सादर केला. 11 हजार 601 कोटींचे हे अंदाजपत्रक आयुक्तांनी स्थायी समितीला (PMC Standing Committee) सादर केले. महापालिकेत प्रशासकच सर्वेसर्वा असल्याने आयुक्तांनी अर्थात स्थायी समितीने हे अंदाजपत्रक मान्य देखील केले. स्थायी समितीला बजेट सादर करताना आयुक्त भाषण अर्थात आपले निवेदन करत असतात. त्यात पुणे शहराविषयी, महापालिकेविषयी त्यांची भूमिका याचा अंतर्भाव असतो. या बजेटमध्ये आयुक्तांनी काय निवेदन केले, हे आम्ही तुमच्यासाठी सविस्तर देत आहोत. (Pune Municipal Corporation Budget 2024-25)

महापालिका आयुक्त यांचे निवेदन: 

मला पुणे महानगरपालिकेचे चौथे अंदाजपत्रक सादर करण्याची व प्रशासक म्हणून दुसरे अंदाजपत्रक सादर
करण्याची जी संधी प्राप्त झाली, त्याचा मला आनंद होत आहे. पुणे शहर जागतिक व देशातील इतर अग्रगण्य शहरापैकी एक असून सर्वांना आकर्षित करणारे आहे. चांगले जीवनमान व राहण्यास सुयोग्य शहर असल्याने तसेच रोजगाराच्या संधी, दर्जेदार शिक्षण, जगातील नाविन्यपूर्ण गोष्टी तत्परतेने आत्मसात करणारे वातावरण असल्याने शहराचे मोठ्याप्रमाणात नागरिकीकरण वाढत आहे. त्याचबरोबर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट गावे झाल्याने पायाभूत सोयी सुविधांवर दिवसेंदिवस ताण वाढत आहे. या सर्व बाबींचा सर्वंकष विचार करुन सर्व समावेशक विकास करण्याची अंतिमतः जबाबदारी प्रशासनावर असते.

स्थानिक स्वराज्य संस्था या शासन संस्थेचाच एक महत्वाचा भाग आहे व त्याचे कार्यक्षेत्र मर्यादित असो किंवा मोठे प्रत्येक नागरीकांची नाळ या संस्थेशी जोडलेली असते. स्थानिक पातळीवरील सार्वजनिक स्वरुपाची विशेषतः जनतेच्या प्राथमिक गरजांशी निगडीत असणारी कामे त्यांचा प्राधान्यक्रम महत्वाचा असतो. अंदाजपत्रक तयार करताना वाढीव सेवा मागणी व उपलब्ध निधी यांची सांगड घालताना मोठी कसरत करावी लागत असते. भारतातील लोकशाही प्रणाली सुदृढ, सक्षम व विकसित करण्याच्या उद्देशाने सरकारने कल्याणकारी शासन व्यवस्थेचा स्वीकार केला आहे. त्या दृष्टीकोनातून स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वायत्तता व स्वातंत्र्य देण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था या शासन व नागरिक यांना जोडणारा दूवा आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिक मनुष्यजीवनाचा प्रारंभ जन्मापासून स्थानिक संस्थेशी जोडला जात असतो व पुढेही सर्व सोयी सुविधांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेशी निगडीत व संपर्कात असतो व अशा गोष्टींबाबत प्रशासनाकडून प्रतिसाद मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळेच नागरिकांची सुप्रशासन, विकास पारदर्शकपणा व गतिमानता अशा सर्व कामांच्या पातळ्यांवर पुणे महानगरपालिकेशी बांधिलकी निर्माण होते. या सर्व गोष्टींचा सर्वांगीण विचार करुन व शहराच्या विकासाची दिशा निश्चित करुन अंदाजपत्रक मा. स्थायी समितीस सादर करीत आहे.

स्वच्छ सर्वेक्षण विशेष सन्मान :
पुणे शहराचा स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये मागील वर्षी २० क्रमांक आणि ३ स्टार मानांकन होते. यापूर्वी स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये १ लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पुणे शहराला १०क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे. केंद्र शासनाचा Ministry of Housing and Urban Affairs यांच्या हस्ते पुणे शहराला सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रथमच GFC अंतर्गत ५ स्टार मानांकनाने गौरविण्यात आले आहे.