PMC Budget 2025 -26 | पुणे महापालिका आयुक्त ४ मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!    – खास सभा घेण्यास स्थायी समितीची मान्यता

Homeadministrative

PMC Budget 2025 -26 | पुणे महापालिका आयुक्त ४ मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक! – खास सभा घेण्यास स्थायी समितीची मान्यता

Ganesh Kumar Mule Feb 28, 2025 5:37 PM

PMC Sky Sign Department |  Mumbai Hoarding Collapse | PMC Commissioner’s order to take action on unauthorized advertisement boards
M J Pradip Chandren IAS | अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांच्याकडे १९ विभागांची जबाबदारी
Shaskiy Adhikari Marathi Sahitya Sammelan | पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन पुण्यात!| पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले स्वागताध्यक्ष !

PMC Budget २०२५-२६| पुणे महापालिका आयुक्त ४ मार्च ला सादर करणार अंदाजपत्रक!

– खास सभा घेण्यास स्थायी समितीची मान्यता

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेचे वर्ष २०२५-२६ चे अंदाजपत्रक (PMC Budget 2025-26) महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) ४ मार्च ला सकाळी 11:30 वाजता सादर करणार आहेत. मुख्य सभा ठरावानुसार आयुक्तांनी 15 जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीला (PMC Standing Committee) सादर करणे आवश्यक असते. मात्र महापालिका आयुक्तांना अपरिहार्य कारणास्तव उचित कालावधीत बजेट सादर करणे शक्य झाले नाही. आता ४ मार्च ला बजेट सादर करण्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समितीच्या समोर ठेवला होता. त्यानुसार समितीने बजेट ची खास सभा घेण्यास नुकतीच मंजुरी दिली आहे. (Pune Municipal Corporation Budget)

| 15 जानेवारी पर्यंत अंदाजपत्रक स्थायी समितीला सादर करणे आवश्यक

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ९५ नुसार महानगरपालिकेचे महसूली, भांडवली इ. उत्पन्न व खर्चाचे अंदाजपत्रक आराखडा (“अ” व “क’) अंदाजपत्रक १५ जानेवारी अगर तत्पूर्वी स्थायी समितीस सादर करणे
आवश्यक आहे. त्यांनतर स्थायी समिती अध्यक्ष त्यात बदल करून बजेट मुख्य सभेला सादर करतात. मुख्य सभेत चर्चा होऊन हे बजेट ३१ मार्च पूर्वी मंजूर होणे आवश्यक असते. त्यांनतर त्यावर अंमल करता येतो. दरम्यान महापालिका आयुक्तांनी बजेट सादर करण्याची तयारी सुरु केली होती. सर्व विभागाकडून आयुक्तांनी याबाबतची माहिती मागवली होती. मात्र महापालिका आयुक्तांना अपरिहार्य कारणास्तव उचित कालावधीत बजेट सादर करणे शक्य झाले नाही. आता ४ मार्च ला बजेट सादर करण्याबाबत प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती मार्फत मुख्य सभेसमोर ठेवण्यात आला होता.

– समाविष्ट गावांच्या विकासावर द्यावे लागणार लक्ष

दरम्यान महापालिका आयुक्त यांच्याकडून अंदाजपत्रकाच्या माध्यमातून समाविष्ट गावांच्या खूप अपेक्षा आहेत. कारण गावे समाविष्ट होऊन वर्षे सरत आली तरी गावांचा रचनाबद्ध विकास झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना मूलभूत समस्यांशी झगडावे लागते. इतके असूनही नागरिकांची करातून सुटका नाही. त्यामुळे नागरिकांना बजेट मधून खूप अपेक्षा आहेत. प्रशासनाने शहरातील रस्त्यांवर चांगले लक्ष देऊन रस्ते मोठे केले आहेत. आता नवीन बजेट मध्ये नवीन काही रस्ते सुचवले जाणार का, याकडे लक्ष असणार आहे. तसेच पुणेकरांसाठी बजेट च्या माध्यमातून आयुक्त नवीन काय घेऊन येणार आहेत, याकडे देखील लक्ष असणार आहे.