PMC Assistant Sports Officer | सहाय्यक क्रीडा अधिकारी पदोन्नती | पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन!   | 15 जुलै पर्यंत करता येणार अर्ज

HomeBreaking Newsपुणे

PMC Assistant Sports Officer | सहाय्यक क्रीडा अधिकारी पदोन्नती | पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन! | 15 जुलै पर्यंत करता येणार अर्ज

गणेश मुळे Jun 19, 2024 6:13 AM

Ganesh Bidkar | बदनामीची धमकी देऊन गणेश बिडकरांकडे खंडणीची मागणी
MLA Fund | Sunil Tingre | सोसायट्यांमध्ये होणार आता आमदार निधीतून विकासकामे
PMC Pune | पुणे महापालिका वर्धापनदिन विशेष | पुणे महापालिका तृतीय पंथीयांना देणार नोकरी!

PMC Assistant Sports Officer | सहाय्यक क्रीडा अधिकारी पदोन्नती | पात्र कर्मचाऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन!

| 15 जुलै पर्यंत करता येणार अर्ज

PMC Assistant Sports officer- (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation- PMC) बऱ्याच वर्षांपासून रखडलेल्या सहाय्यक क्रीडा अधिकारी पदी पदोन्नती देण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. यासाठी 15 जुलै पर्यंत अर्ज करता येणार आहे. दरम्यान या पदोन्नती साठी महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार केला जाणार आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. (Pune PMC News)
क्रीडा सेवा श्रेणी -3 या संवर्गातील सहाय्यक क्रीडा अधिकारी हे पद पुणे महापालिकेत दोन माध्यमातून भरण्यात येते. एक म्हणजे 50% नामनिर्देशन आणि दुसरे 50% पदोन्नती. विहित शैक्षणिक धारणा आणि अटी शर्ती पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या पदावर पदोन्नती दिली जाते. दरम्यान गेल्या बऱ्याच वर्षांपासून पदोन्नती ने पद भरण्यासाठी मंजूरी मिळत नव्हती. अखेर 5 सप्टेंबर 2023 ला तत्कालीन आयुक्तांनी पदोन्नती ने पद भरण्यासाठी मान्यता दिली होती. तरीही ही प्रक्रिया पुढे सरकत नव्हती.
अखेर पदोन्नती ने पद भरण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळाला आहे. त्यानुसार याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून कर्मचाऱ्यांना अर्ज करण्यासाठी 15 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाकडे हे अर्ज सादर करायचे आहेत. तसेच पद भरताना सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार केला जाणार आहे. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.