PMC Assistant Commissioner Dr. Jyoti Dhotre | पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त डॉ ज्योती धोत्रे यांचे निधन! 

HomeBreaking Newsपुणे

PMC Assistant Commissioner Dr. Jyoti Dhotre | पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त डॉ ज्योती धोत्रे यांचे निधन! 

गणेश मुळे May 26, 2024 3:40 PM

The State Government should not accept the PMC administration’s proposal regarding the change in promotion of the post of PMC Assistant Commissioner
PMC Pune Employees | लेखनिकी संवर्गावर अन्याय होत असल्याची पुणे मनपा कर्मचाऱ्यांची खंत
PMC Pune Employees |  Pune municipal employees regret that injustice is being done to the clerical cadre

PMC Assistant Commissioner Dr. Jyoti Dhotre | पुणे महापालिका सहाय्यक आयुक्त डॉ ज्योती धोत्रे यांचे निधन!

| अकाली निधनाने व्यक्त होतेय हळहळ

Dr. Jyoti Dhotre PMC – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation (PMC) राज्य सरकारकडून प्रतिनियुक्ती वर आलेल्या आणि सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहणाऱ्या डॉ ज्योती धोत्रे यांचे आज ह्रदय विकाराने निधन झाले. त्या 36 वर्षांच्या होत्या. (Assistant Commissioner Jyoti Dhotre)
त्यांच्या पश्चात नवरा, सासू सासरे, आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. त्यांचे पती हे उद्योजक आहेत.
धोत्रे या 2020 साली महापालिकेत प्रति नियुक्ती वर आल्या होत्या. राज्य सरकारमध्ये त्या मुख्याधिकारी (CEO) या पदावर काम पाहत होत्या. पुणे महापालिकेत त्यांना सहाय्यक आयुक्त म्हणून नेमण्यात आले होते.  त्यांनी कोंढवा येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयात जवळपास ३ वर्ष हून अधिक काळ सहाय्यक आयुक्त म्हणून काम पाहिले. मागील दोन महिन्यापूर्वी त्यांची बदली एलबीटी विभागात करण्यात आली होती.
मात्र आज त्यांचे निधन झाले. धोत्रे यांच्या अकाली निधनाने महापालिका वर्तुळात आणि शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघे 36 वर्ष वय असताना त्यांचे जाणे चटका लावून गेले. त्यांच्यावर बाणेर येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.