PMC Aspirational Toilets | 4 आकांक्षी शौचालय तयार करण्याच्या बदल्यात 4 ठिकाणी होर्डिंग उभारायला महापालिका ठेकेदाराला देणार परवानगी! 

HomeपुणेBreaking News

PMC Aspirational Toilets | 4 आकांक्षी शौचालय तयार करण्याच्या बदल्यात 4 ठिकाणी होर्डिंग उभारायला महापालिका ठेकेदाराला देणार परवानगी! 

गणेश मुळे Feb 13, 2024 1:40 PM

Deccan Gymkhana Chitale Corner Pune | डेक्कन जिमखान्या जवळील चितळे कॉर्नरचा वाढदिवस | नवीन वर्षाची सुरुवात एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने!
PMC PEHEL 2024 | ई-कचरा व प्लास्टिक संकलन करण्यासाठी 400 हून अधिक केंद्र | महापालिकेकडून पेहेल-२०२४ महाअभियानाचे आयोजन
PMC Solid Waste Management Department | पुणे महापालिकेने गेल्या 7 दिवसांत नागरिकांकडून साडे सहा लाखांचा दंड केला वसूल | कारण घ्या जाणून

PMC Aspirational Toilets | 4 आकांक्षी शौचालय तयार करण्याच्या बदल्यात 4 ठिकाणी होर्डिंग उभारायला महापालिका ठेकेदाराला देणार परवानगी!

| महापालिकेला दरवर्षी मिळणार 1 लाख 20 हजार; दर तीन वर्षांनी 5% वाढ

PMC Aspirational Toilets | पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) शहरातील 4 ठिकाणी ठेकेदाराच्या माध्यमातून आकांक्षी शौचालय (Pune Aspirational Toilet) तयार करणार आहे. त्या बदल्यात महापालिका ठेकेदाराला शहरातील 4 ठिकाणी होर्डिंग उभारायला परवानगी देणार आहे. नेटवर्क मीडिया सोल्युशन (Network Média Solution) कंपनीला हे काम 10 वर्षासाठी देण्यात आले आहे. त्यातून महापालिकेला दरवर्षी 1 लाख 20 हजार उत्पन्न मिळणार आहे. दर तीन वर्षांनी यात 5 टक्क्यांची वाढ केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायी समिती (PMC Standing Committee) समोर ठेवण्यात आला आहे. (PMC Solid Waste Management Department) 

पुणे महापालिका हद्दीमध्ये एकूण २९२ सार्वजनिक, ८२२ वस्तीपातळीवरील शौचालय व १७४ मुताऱ्या असे एकूण १२८८ ब्लॉक कार्यरत आहेत. तसेच सार्वजनिक शौचालयांची देखभाल व दुरुस्ती करणेकरिता पुणे महानगरपालिकेस दर वर्षी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. दर वर्षी होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरातील शौचालय, मुतारी यांची नियमित देखभाल, दुरुस्ती व तपासणी करण्यात येते. त्यामुळे काही शौचालय ठेकेदाराच्या माध्यमातून विकसित करून घेण्यात येणार आहेत. त्यानुसार हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

1.  लोकेशन १ शौचालय | जुना एअरपोर्ट रोड, टिंगरे नगर रोड,
2. लोकेशन २ शौचालय | विश्रांतवाडी चौक, जुना एअरपोर्ट रोड
3. लोकेशन ३ शौचालय | चंदन नगर, नगर रोड,
 4. लोकेशन 4 शौचालय खराडी गाव
या 4 ठिकाणी ठेकेदार नेटवर्क मिडिया सोल्युशन यांनी  अस्तित्वातील शौचालय दुरुस्ती करणेस व शौचालयलगत मोबाईल चार्जिंग पॉइंट सह ATM ब्लॉक उभारण्यात येऊन आकांक्षी शौचालय तयार करायचे आहे.
त्यानुसार खालील ठिकाणी ठेकेदाराला होर्डिंग उभारायला परवानगी दिली जाणार आहे.
1. एफ सी रोड Fergusson College Road (18.530898, 73.844168)
2. कोरेगाव पार्क Koregaon Park (18.539203, 73.901690)
3. कल्याणी नगर Kalyani Nagar 1 (18.542443, 73.904840)
4. कल्याणी नगर Kalyani Nagar 2 (18.549770, 73.902486)
याप्रमाणे एकूण ४ होर्डिंग ठेकेदार स्वखर्चाने शासकीय यंत्रणेच्या आवश्यक परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र घेऊन उभारणार आहे. एक होर्डिंगचे ९०० स्क्वे. फुट क्षेत्र असून एकूण चार होर्डिंगचे ३६०० स्क्वे. फुट क्षेत्र राहील. याप्रमाणे आवश्यक जाहिरात शुल्क आकारणी व वसुली करण्याची कार्यवाही व होर्डिंग उभारणे संदर्भातील पुणे मनपा च्या परवाना व आकाशचिन्ह विभागाचे सर्व अटीशर्ती व प्रचलित कायद्याचे आधीन राहून परवाना परवाना घेणे व शुल्क अदा करणे, नुतनीकरण करणे होर्डिंग उभारणे या बाबी ठेकेदाराने करायच्या आहेत.
दरम्यान हे काम 10 वर्षासाठी देण्यात आले आहे. पहिल्या वर्षी महापालिकेला 1 लाख 20 हजार इतके उत्पन्न मिळणार आहे. तर पुढील प्रत्येक 3 वर्षांनी यात 5% वाढ केली जाणार आहे. या वाढीने 10 व्या वर्षी महापालिकेला 1 लाख 38 हजार 915 रुपये मिळतील.