PMC Additional Commissioner | महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी कुणाची वर्णी लागणार? | महापालिका तीन अधिकाऱ्यांचा प्रस्ताव आठवडाभरात  राज्य सरकारकडे पाठवणार!

Homeadministrative

PMC Additional Commissioner | महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी कुणाची वर्णी लागणार? | महापालिका तीन अधिकाऱ्यांचा प्रस्ताव आठवडाभरात  राज्य सरकारकडे पाठवणार!

Ganesh Kumar Mule Aug 25, 2026 8:54 PM

Bavdhan DP Road | बावधन परिसरात ताब्यात आलेल्या जागेत ३६ मी डीपी रस्ता करण्याच्या अतिरिक्त आयुक्तांच्या सूचना
PMC Deputy Commissioner Transfer | उपायुक्त अविनाश सकपाळ यांच्याकडे घनकचरा विभाग, संदीप कदम यांच्याकडे मोटार वाहन विभाग तर किशोरी शिंदे यांच्याकडे पर्यावरण विभागाची जबाबदारी
Dhanori Charholi Road | धानोरी-चऱ्होली रस्त्याचे भूमिपूजन; आमदार बापूसाहेब पठारे यांच्या पाठपुराव्याला यश

PMC Additional Commissioner | महापालिका अतिरिक्त आयुक्त पदी कुणाची वर्णी लागणार? | महापालिका तीन अधिकाऱ्यांचा प्रस्ताव आठवडाभरात  राज्य सरकारकडे पाठवणार!

| महापालिका आयुक्तांची मुख्य सभेत माहिती

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – राज्य सरकारने महापालिकेत एक अतिरिक्त आयुक्तपद हे महापालिका अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवले आहे. त्यानुसार आता लवकरच एक महापालिका अधिकारी आता अतिरिक्त आयुक्त होणार आहे. या पदासाठी पात्र असणाऱ्या तीन अधिकाऱ्यांचा प्रस्ताव महापालिका एका आठवड्यात राज्य सरकार कडे पाठवणार आहे. त्यानुसार सरकार ची समिती एक नावावर शिक्कामोर्तब करणार आहे.यात सेवाज्येष्ठता आणि नियमानुसार उपायुक्त अविनाश सकपाळ यांचे नाव आघाडीवर असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.  (PMC Officers)

महापालिका अधिकाऱ्या साठी अतिरिक्त आयुक्त पद राखीव असताना देखील सद्यस्थितीत तिन्ही पदे ही राज्य सरकार कडून भरण्यात आली आहेत. याबाबत आजच्या मुख्य सभेत नगरसेवक अरविंद शिंदे, पृथ्वीराज सुतार यांच्यासह बऱ्याच नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केला. यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी उत्तर दिले. आयुक्तांनी सांगितले कि, अतिरिक्त आयुक्त पदासाठी दोन नावे पात्र होत होती. मात्र आम्ही सरकार ला तीन नावे पाठवण्याबाबत आग्रही होतो. त्यानुसार नियम आणि सेवाज्येष्ठता याचा आधार घेत आम्ही तीन लोकांची यादी तयार केली आहे. ही यादी आम्ही आठवडा भरात राज्य सरकार ला सादर करू. सरकारची समिती नियमानुसार यातील एक नाव आम्हाला कळवेल, त्यानुसार महापालिका अधिकाऱ्या मधून एकाची या पदासाठी निवड केली जाईल.

राज्य सरकारने महापालिकेत एक अतिरिक्त आयुक्तपद हे महापालिका अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवले आहे. त्याबाबतचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्यानुसार पहिले अतिरिक्त आयुक्त होण्याचा मान सुरेश जगताप यांना मिळाला होता. त्यानंतर ज्ञानेश्वर मोळक, विलास कानडे यांना संधी मिळाली होती. त्यानंतर महापालिका अधिकारी यांच्यातील अंतर्गत वादामुळे महापालिका अधिकाऱ्याला हे पद मिळू शकले नाही. त्यामुळे या पदावर राज्य सरकार कडून अधिकारी नेमण्यात आला. सद्यस्थितीत महापालिका अतिरिक आयुक्त पदावर प्रजीत नायर, पवनीत कौर आणि ओमप्रकाश दिवटे हे काम पाहत आहेत.

महापालिका अधिनियम, सेवानियमावली आणि सेवा ज्येष्ठतेनुसार हे महापालिका अतिरिक्त आयुक्त पद नियुक्त केले जाते. यासाठी बरेच जण पात्र ठरत आहेत. त्यानुसार राज्य सरकारला महापालिकेकडून ३ लोकांच्या नावांची यादी पाठवायची आहे. सामान्य प्रशासन विभागाची ही यादी अंतिम देखील झाली आहे. हा प्रस्ताव आता सरकारला पाठवला जाईल.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: