Lokmat Office to Savitri Garden Road | लोकमत कार्यालय ते सावित्री गार्डन रस्ता : आगामी ६ महिन्यात रस्ता पूर्ण करणार – महापालिका आयुक्तांचे आश्वासन

Homeadministrative

Lokmat Office to Savitri Garden Road | लोकमत कार्यालय ते सावित्री गार्डन रस्ता : आगामी ६ महिन्यात रस्ता पूर्ण करणार – महापालिका आयुक्तांचे आश्वासन

Ganesh Kumar Mule Aug 25, 2026 7:17 PM

PMC Pune Budget 2026-27 | पीएमपी बळकटीकरणावर भर | मेट्रो विस्तारासह एकात्मिक वाहतूक आराखडा | ५४ किमी भुयारी रस्ते
Extreme Book of World Records | पुण्यातील १६ जणांची एक्सट्रीम बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद
PMC Action against Pub and Bar | पुणे महापालिकेकडून कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमाननगर परिसरातील 40 हॉटेल, रेस्टॉरंट वर कारवाई! 

Lokmat Office to Savitri Garden Road | लोकमत कार्यालय ते सावित्री गार्डन रस्ता : आगामी ६ महिन्यात रस्ता पूर्ण करणार – महापालिका आयुक्तांचे आश्वासन

| भू संपादन साठी १८० कोटी लागणार

 

PMC GB Meeting – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका मुख्य सभेत लोकमत कार्यालय ते सावित्री गार्डन (Lokmat Office to Savitri Garden Road) पर्यंतच्या रस्त्यांच्या जागा ताबा घेण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. विविध नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केले. यावर महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval kishore Ram IAS) यांनी आश्वासन दिले की, आगामी ६ महिन्यात हा रस्ता पूर्ण केला जाईल. त्यासाठी नियमाचा आधार घेऊन जबरदस्ती ने भूसंपादन करून जागा ताब्यात घेतल्या जातील. असे देखील आयुक्तांनी सांगितले. (Naval Kishore Ram IAS)

धायरी आणि नऱ्हे परिसरात रस्त्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे या उपनगरांमध्ये वाहतूक कोंडी आढळून येते. परिणामी नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या परिसरातील रस्ते विकसित करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये 3 रस्त्यांचा समावेश आहे. (Pune PMC News)

यातील एक रस्ता लोकमत कार्यालय ते सावित्री गार्डन रस्ता हा असणार आहे. 30 मीटर रुंदीचा हा डीपी रस्ता केला जाणार आहे. याची लांबी सुमारे 1200 मीटर आहे. हा रस्ता करण्यासाठी मुख्य कॅनॉल आणि बेबी कॅनॉल पुलाचे देखील काम करावे लागणार आहे.

दरम्यान रस्ता विकसनात बाधा ठरणाऱ्या जागा महापालिकेच्या ताब्यात आहेत का, असा प्रश्न मुख्य सभेत उपस्थित करण्यात आला. दरम्यान याबाबत रस्ता रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीत आला होता. मात्र गेल्या १० वर्षापासून नगरसेवक पाठपुरावा करून देखील रस्ता होत नसल्याने मुख्य सभेत नगरसेवक आक्रमक झाले. यामधे नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, काकासाहेब चव्हाण यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

दरम्यान यावर महापालिका आयुक्त यांनी उत्तर दिले. आयुक्त राम म्हणाले, आगामी ६ महिन्यात या रस्त्याचे काम आम्ही पूर्ण करू. रस्ता भू संपादन आता आम्ही जबरदस्तीने करणार आहोत. त्यासाठी नियमाचा आधार घेतला जाईल. यासाठी अंदाजे १८० कोटींची आवश्यकता आहे. त्यासाठी आम्ही तरतूद केली आहे आणि कमी पडली तर तरतूद करू. मात्र रस्ता लवकर केला जाईल, असे आयुक्त म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: