PMC Additional Commissioner | पुणे महापालिकेला रिक्त जागांवर दोन अतिरिक्त आयुक्त लवकरात लवकर मिळावेत!
| केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी
CM Devednra Fadanvis – (The Karbhari News Service) – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्याशी आज मुंबई येथे पुण्याच्या विविध विकासकामांसंदर्भात चर्चा झाली. यावेळी महापौर यांनी पुणे महापालिकेला रिक्त जागांवर दोन अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) लवकरात लवकर मिळावेत, अशी मागणी केली. शिवाय पुणे आणि खडकी या दोन कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पुणे महापालिकेतील विलीनीकरण प्रक्रियेला गती मिळावी. यासहीत विविध मागण्या केल्या. (Pune Municipal Corporation – PMC)
चर्चा झालेले मुद्दे…
– पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठीच्या धावपट्टीच्या विस्तारणीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासंदर्भात चर्चा
– पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळाला गती देण्यासाठी बैठकीचे लवकरच आयोजन
– राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये विमानतळ साकारणे, अस्तित्वातील विमानतळांच्या धावपट्टींचा विस्तार करणे, नाईट लॅडिंगची सुविधा उपलब्ध करणे, उडान योजनेच्या माध्यमातून राज्यांतर्गत अधिक विमानसेवा उपलब्ध करून देणे , राज्यातील विमानतळांच्या पायाभूत सुविधांवर काम करणे यासंदर्भात नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक
– केंद्र सरकारकडून पुणे शहराला एक हजार नव्या ई-बसेस मिळण्यासाठी राज्य सरकारकडून केंद्राला प्रस्ताव पाठवण्यासंदर्भात चर्चा
– पुणे आणि खडकी या दोन कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पुणे महापालिकेतील विलीनीकरण प्रक्रियेला गती मिळावी
– पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेसंदर्भातील प्रक्रियेला वेग
– पुणे शहराची भविष्याची गरज लक्षात घेत पुणे शहराला मुळशी धरणातून पाणी पुरवठा करण्याचे नियोजन
– पुणे महापालिकेला रिक्त जागांवर दोन अतिरिक्त आयुक्त लवकरात लवकर मिळावेत
COMMENTS