PMC Action against Pub and Bar | पुणे महापालिकेकडून कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, विमाननगर परिसरातील 40 हॉटेल, रेस्टॉरंट वर कारवाई!
PMC Action Against Pub and Bar – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाकडून (PMC Building Devlopment Department) शहरातील अनधिकृत हॉटेल, रेस्टॉरंटतसेच रुफ टॉप हॉटेल वर कारवाई हाती घेतली आहे. यामध्ये कार्यकारी अभियंता झोन क्र. ४ कडून मुंढवा, कोरेगावपार्क, पुणे स्टेशन, कल्याणीनगर, विमाननगर, घोरपडी या भागामध्ये हॉटेल, रेस्टॉरंवर कारवाई करण्यात आली. जवळपास 40 हॉटेल, रेस्टॉरंट वर कारवा. करण्यात आली आहे. यात सुमारे 54300 चौरस फूट अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले. अशी माहिती बांधकाम विकास विभागाकडून देण्यात आली. (Pune Municipal Corporation (PMC)
मुंढवा भागामध्ये नदी लगत असलेले मोठे हॉटेल्स, हॉटेल अनवाईड, हॉटेल सुपरक्लब, ओरीला नव्याने चालू असलेले हॉटेल मधील अनासधिकृत बांधकाम, जॉ कटर च्या माध्यमातून पूर्ण पाडण्यात आलेले आहे. या मधील काही हॉटेल्स हे पब्स म्हणून वापरात होती. या भागामधील कारवाई दरम्यान ढोले पाटील वॉर्ड ऑफिस कडील संयुक्त कारवाई देखील नियोजित
करण्यात आली होती.त्याचेकडून रस्त्यावरील अतिक्रमन, बोर्ड बॅनर्स ( आकाश चिन्ह परवाना विभाग ) काढून टाकण्याची कारवाई करण्यात आली.
सदर कारवाईत एकूण ५ गटात विभागणी करण्यात आली असुन स्टाफ व मशिनरी उपलब्ध करण्यात आली होती. आज घेण्यात आलेल्या रेस्टॉरंट हॉटेलस यांचे साईड मार्जिन मधील अनधिकृत असलेल्या शेडस या पूर्वी कारवाई करून काढून घेण्यात आलेल्या होत्या. सदर शेडस ह्या संबंधितांनी परत उभारणी केली असल्यामुळे आज शेडस परत काढून घेण्यात आलेल्या आहेत. यातील काही ठिकाणी ३-४ वेळ कारवाई करण्यात आलेली आहे. असे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.