PMC Accident Insurance | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना! | आतापर्यंत २१ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना फायदा
PMC Accident Insurance | (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने कर्मचाऱ्यांसाठी समूह अपघात विमा योजना (PMC GroupAccident Insurance Scheme) चालवली जाते. महापालिकेचे अनेक कर्मचारी अपघातांना बळी पडून कायमचे अपंग होतात. तसेच अनेक लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळे अपघातात बळी पडणाऱ्या अशा महापालिका कर्मचाऱ्यांना पुणे महापालिका विमा संरक्षण देत आहे. महापालिकेच्या सर्व कामगारांना आता सुमारे 10 लाखांचा विमा उतरवण्यात येत आहे. त्या बदल्यात त्यांना त्यांच्या पगारातून केवळ 265 रुपये दरमहा द्यावे लागतात. महापालिका प्रशासनाने २०१६-१७ या वर्षापासून या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. आतापर्यंत सुमारे 21 कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांना महापालिकेने 1 कोटी 94 लाख रुपये दिले आहेत. अशी माहिती मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे (Chief Labour Officer Nitin Kenjale PMC) यांनी दिली. (PMC Accident Insurance)
– सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी लागू योजना
महापालिकेच्या (PMC Pune) विविध विभागात अनेक कर्मचारी (PMC Pune Employees) काम करतात. जवळपास 20 हजार कर्मचारी आहेत. शहराच्या सर्व विकासकामांची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. यामध्ये अ गटातील अधिकाऱ्यांसह ड गटातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी पालिकेकडून विविध योजना (PMC Services) दिल्या जातात. आतापर्यंत पालिकेकडून कामगारांना अपघात विमा दिला जात नव्हता. परंतु 2016-17 पासून महापालिकेच्या अधिकारी व कामगारांना विमा संरक्षण मिळत आहे. कारण जेव्हा एखादा कामगार अपघाताला बळी पडतो तेव्हा त्याचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त होते. अनेकांना आपले दोन्ही हात आणि पाय गमवावे लागतात, काहींना डोळे गमवावे लागतात. यामुळे हे लोक काम करण्यास सक्षम राहत नाहीत. अशा कामगारांना पालिका विम्याच्या माध्यमातून आधार देत आहे. अशा प्रकारची योजना राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांना 10 लाखांचा विमा मिळत आहे. जे कायमचे अपंग असतील, त्यांना या योजनेचा 100 टक्के लाभ दिला जातो. कारण अपंगत्वाच्या प्रकारानुसार त्याचा लाभ कामगारांना मिळ आहे. पालिकेत काम करणाऱ्या अ गटातील अधिकाऱ्यांपासून ते ड गटातील कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. यासाठी या कामगारांना त्यांच्या पगारातून दरमहा केवळ २६५ रुपये द्यावे लागतात. (Pune Municipal Corporation News)
दरम्यान शहर अभियंता कार्यालयाकडील अपघातात नुकतेच निधन पावलेले कर्मचारी सुनिल भगत यांच्या वारस पत्नी नंदा सुनिल भगत यांना १० लाख रुपयाची मदत करण्यात आली आहे. अशी माहिती केंजळे यांनी दिली.
——
पुणे महापालिकेचे सर्व कायम कामगारांचा विमा उतरवला आहे. कुणाचा अपघाती मृत्यू झाला असेल तर तत्काळ कामगारांनी याची माहिती कामगार कल्याण विभागाकडे कळवणे आवश्यक आहे. याची कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. जेणेकरून त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना मिळेल.
– नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी.
COMMENTS