PM Modi Pune Visit | आगामी काळात भव्य जाहीर सभा त्याच ठिकाणी | शहर भाजप कडून उद्घाटन सोहळ्या विषयी स्पष्टीकरण 

HomeBreaking News

PM Modi Pune Visit | आगामी काळात भव्य जाहीर सभा त्याच ठिकाणी | शहर भाजप कडून उद्घाटन सोहळ्या विषयी स्पष्टीकरण 

Ganesh Kumar Mule Sep 26, 2024 7:57 PM

Pune Metro | पुणे मेट्रो धावली रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत
Pune Metro | पुणे मेट्रोतर्फे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात!
Shivajinagar ST Station Pune | शिवाजीनगर एसटी स्थानक १५ दिवसांत पूर्ववत जागी आणा अन्यथा मुख्यमंत्र्यांची गाडी अडवू | माजी आमदार मोहन जोशी

PM Modi Pune Visit | आगामी काळात भव्य जाहीर सभा त्याच ठिकाणी | शहर भाजप कडून उद्घाटन सोहळ्या विषयी स्पष्टीकरण

 

 

BJP Pune City – (The Karbhari News Service) – प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी  यांच्या  हस्ते शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रोच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज सायंकाळी 6.00 वाजता सप महाविद्यालय येथे पार पडणार होता. परंतु शहरात होत असणाऱ्या सततच्या जोरदार अतिवृष्टीमुळे सदरील कार्यक्रम हा पुढे ढकलण्यात आला असून पुढील नियोजन आपल्याला येत्या काही दिवसात त्वरित कळविले जाईल. असा खुलासा शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे यांच्याकडून करण्यात आला आहे. (Pune metro News)

सर्व शासकीय यंत्रणा, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली,परंतु ही मेहनत वाया जाणार नाही. आज पुण्यामध्ये परत एकदा हवामान खात्याने रेड अलर्ट घोषित केलेला आहे. या पार्श्वभूमीवर आजची सभा व मेट्रो मार्गिकेचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आलेले आहे. भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने सदर कार्यक्रमासाठी अतिशय जोरदार तयारी केलेली होती. परंतु काही गोष्टी ह्या मनुष्याच्या हातात नसतात. पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा दोष न कुणाचा  ह्या उक्तीप्रमाणे पुढील काळात कार्यक्रम अधिक जोमाने करण्याचा निर्धार भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने करण्यात आलेला आहे. पुणे शहराच्या नावलौकिकाला साजेसा उद्घाटन सोहळा आगामी काळात ठरवून भव्य जाहीर सभा त्याच ठिकाणी आम्ही करू असा ठाम विश्वास मला आहे. असे घाटे म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0