जीम, ब्युटी पार्लर आणि सलूनसाठी अटींसह परवानगी
:राज्य सरकारचे नवे आदेश
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये आता सलून, ब्युटी पार्लर आणि जीम संदर्भातील निर्बंधात बदल करण्यात आला आहे. याबाबतचे नवे आदेश रविवारी जारी करण्यात आले आहेत. १० जानेवारीपासून हे आदेश लागू होणार आहेत. ब्युटी सलून आणि हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवता येईल. तसंच जीमसुद्धा ५० टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येणार आहे. याआधी दोन्ही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते,
सौंदर्य सलूनसाठी 50% क्षमतेसह उघडे राहण्याची परवानगी दिली जाईल . सलूनमध्ये मास्क काढता येणार नाही अश्याच सेवा सुरु राहतील. फक्त अशाच कामांना परवानगी असेल ज्यांना कोणाला मास्क काढण्याची गरज नाही. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल. सलून मधील कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले असतील.
जीमसंदर्भातही असेच आदेश देण्यात आले आहेत. मास्क वापरण्याच्या अटीवरच 50% क्षमतेसह जिम उघडे ठेवण्याची परवानगी आहे . केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल. जिमचे सर्व कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले असतील .
Revised guidelines for Beauty Salons & Gyms pic.twitter.com/lzSQZUJlXg
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 9, 2022
COMMENTS