Paud Phata Balbharati Road | पौड फाटा – बालभारती रस्ता आता विलंब न करता लवकरात लवकर सुरु करा | माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Homeadministrative

Paud Phata Balbharati Road | पौड फाटा – बालभारती रस्ता आता विलंब न करता लवकरात लवकर सुरु करा | माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्तांकडे मागणी 

Ganesh Kumar Mule Oct 29, 2025 8:27 PM

Pune News | रस्त्यावर प्रतिकात्मक शाळा भरवून आंदोलन
PMC Election Ward 4 | प्रभाग क्रमांक ४ अ मधून माजी नगरसेवक भैय्यासाहेब जाधव यांचा जोर | काम आणि स्वतःची प्रतिमा हा ठरणार करिष्मा 
Aadhaar Update | UIDAI अलर्ट | ही माहिती आधार कार्डमध्ये अपडेट न केल्यास सरकारी योजना उपलब्ध होणार नाहीत | ₹ 25 अद्यतन शुल्क आहे

Paud Phata Balbharati Road | पौड फाटा – बालभारती रस्ता आता विलंब न करता लवकरात लवकर सुरु करा | माजी नगरसेवकांची महापालिका आयुक्तांकडे मागणी

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांनी पौड फाटा बालभारती रस्ता हा भुयारी करता येतो आहे का याची चाचणी करण्याचे सुतोवाच केले आहे. मात्र आता कुठलाही विलंब न करता हा रस्ता लवकरात लवकर सुरु करावा, अशी मागणी माजी नगरसेवक उज्वल केसकर आणि सुहास कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.  (Naval Kishore Ram IAS)

माजी नगरसेवक यांच्या निवेदना नुसार  सर्वोच्च न्यायालय यांनी महानगरपालिकेने विकास आराखड्यामध्ये आखलेला रस्ता त्यावर सुपर इम्पोज केलेला HCMTR मान्य केलेला आहे. विकास आराखड्यामध्ये भुयारी मार्गांची मान्यता आहे त्याबाबत सल्लागार नेमून त्याचा डीपीआर देखील तयार आहे. त्यानुसार त्या ठिकाणी कार्यवाही करावी.  परंतु कुठल्याही परिस्थितीत आता सर्व प्रक्रिया मध्ये तावून-सुलाखून निघालेला पौड फाटा बालभारती रस्ता मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या पर्यावरण विभागाची ना हरकत घेऊन सुरू करावा. नवीन कुठलाही विचार यामध्ये करू नये. कारण HCMTR रस्ता देखील या रस्त्यावरून जात आहे म्हणजे भुयारी रस्ता केला तरी वरचा रस्ता करावाच लागणार आहे. त्यामुळे महापलिका आयुक्त यांनी या मान्य प्रस्तावाच्या पेक्षा वेगळा विचार करून हा रस्ता लांबवू नये, असे माजी नगरसेवकांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: