7th Pay Commission 5th Installment  | पुणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 7 व्या वेतन आयोगाच्या पाचव्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबत सर्क्युलर जारी!

Homeadministrative

7th Pay Commission 5th Installment  | पुणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 7 व्या वेतन आयोगाच्या पाचव्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबत सर्क्युलर जारी!

Ganesh Kumar Mule Oct 29, 2025 7:14 PM

PMC : 7th pay commission : वेतन लवकर करण्यासाठी प्रशासनाची लगबग  : बिल लेखनिकांना शनिवार, रविवारी काम करण्याचे आदेश 
7th Pay Commission | PMPML | पीएमपी कर्मचाऱ्यांना 100% सातवा वेतन आयोग लागू करा | पीएमटी इंटक संघटनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी
7th Pay Commission : PMC : वेतन निश्चितीकरणासाठी वेतन आयोग कक्ष स्थापन करा  : महापालिका कामगार संघटनांची आयुक्तांकडे मागणी 

7th Pay Commission 5th Installment | पुणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी | 7 व्या वेतन आयोगाच्या पाचव्या हफ्त्याची रक्कम देण्याबाबत सर्क्युलर जारी!

 

Pune Municipal Corporation (PMC) – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका सेवानिवृत्त कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी (PMC Employees and Officers) आनंदाची बातमी आली आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग (7th Pay Commission)आधीच लागू झाला आहे. कर्मचाऱ्यांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चवथ्या हफ्त्याची रक्कम आधीच मिळाली आहे. आता पाचवा हफ्ता देखील लवकरच मिळणार आहे. याबाबतचे सर्क्युलर लेखा व वित्त विभागाकडून (PMC Finance Department) जारी करण्यात आले आहे. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी तसेच प्राथमिक शिक्षण विभागाकडील शिक्षक, शिक्षकेतर व माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच तंत्र शाळांकडील कर्मचाऱ्यांना 7  व्या वेतन आयोगापोटी पाच समान हप्त्याची रक्कम रोखीने अदा करणेस मान्यता प्राप्त झालेली आहे.

| सर्क्युलर मध्ये काय म्हटले आहे?

सर्क्युलर मध्ये म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिकेतील जे अधिकारी, कर्मचारी 1 जून 2016 नंतर सेवानिवृत्त झालेले आहेत, अशा अधिकारी, कर्मचारी व मयताचे वारस यांना ७ व्या वेतन आयोगानुसार 1 जानेवारी 2016 ते सेवानिवृत्ती दिनांकापर्यंत 7 व्या वेतन आयोगाचा पाचव्या हप्त्याची बिले १५ नोव्हेंबर अखेर ऑडीट विभागाकडून तपासून घ्यायची आहेत.

6 व्या वेतन आयोगाच्या वेतन आकारणी व वेतन फरक हप्त्यांची ज्याप्रमाणे नोंदी सेवापुस्तकामध्ये करणेत आलेल्या आहेत, त्याचप्रमाणे 7 व्या वेतन आयोगापोटी कर्मचाऱ्यांना अदा केलेल्या हप्त्याची व पुढील मिळणाऱ्या हप्त्याची तसेच, विवरण पत्रातील वेतनासंबंधीची नोंद सेवापुस्तकामध्ये संबंधीत पगार बिल लेखनिकांनी ठेवणे आवश्यक आहे. तरी, सर्व खातेप्रमुख यांनी त्याचे नियंत्रणाखालील सर्व संबंधीत बिल लेखनिकांना त्या सूचना देण्याची तजवीज करावी. असे देखील वित्त व लेखा विभागाने म्हटले आहे.

 

Screenshot

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: