Palkahi Sohala 2024 | पालखी मार्गांवर वारकरी यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश | पालखी मार्गांची अधिकाऱ्या सोबत आयुक्तांची पाहणी
Palakhi Sohala 2024 – (The Karbhari News Service) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन पुणे शहरात रविवार, ३० जून रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या वतीने पालखी मार्गांची जागा पाहणी आयोजित करण्यात आली होती. (Pune Municipal Corporation (PMC)
येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय, औंध – बाणेर क्षेत्रिय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय, हडपसर क्षेत्रिय कार्यालय या ठिकाणच्या सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष नियोजनाबाबत रस्ते दुरूस्ती, अतिक्रमण, मुक्कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सेवा याबाबत सोयी- सुविधा उपलब्ध करणे, पावसाळी गटारे, चेंबर्स दुरुस्त करणेबाबत व स्वच्छता विषयक कामे करणेसंबंधी प्रशासक तथा आयुक्त, यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. (Dr Rajendra Bhosale IAS)
जागा पाहणीस मा. डॉ. राजेन्द्र भोसले, प्रशासक तथा आयुक्त पृथ्वीराज बीपी, अति महा. आयुक्त (ई), संदीप कदम, उपायुक्त (घनकचरा विभाग), अनिरुध्द पावसकर, मुख्य अभियंता (पथ विभाग ), नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता (पथ विभाग ), मा. गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, दिनकर गोजारे, अधिक्षक अभियंता ( मलनिःसारण देखभाल व दुरुस्ती विभाग), साहेबराव दांडगे, अधिक्षक अभियंता (पथ विभाग ), अशोक घोरपडे, मुख्य उद्यान अधिक्षक, किशोरी शिंदे, उपायुक्त (परिमंडळ क्र. १ ), मा. अविनाश सकपाळ, उपायुक्त (परिमंडळ क्र. ५) मा. कल्पना बळीवंत, प्र. मुख्य आरोग्य अधिकारी, चंद्रसेन नागटिळक, सहाय्यक महापालिका आयुक्त ( येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालय), गिरीश दपकेकर, सहाय्यक महापालिका आयुक्त ( औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय), रवि खंदारे, सहाय्यक महापालिका आयुक्त (शिवाजीनगर घोले रोड क्षेत्रिय कार्यालय), अस्मिता तांबे, सहाय्यक महापालिका आयुक्त (भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय), आणि क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकारी व श्री संत ज्ञानेश्वर व श्री संत तुकाराम महाराज संस्थांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गाची जागा पाहणीमध्ये खालील विषयावर चर्चा होऊन संबंधितांना पालखीचे स्वागतप्रसंगी करावयाचे नियोजनाबाबत आदेश देण्यात आले.
मलनिःसारण विभागास म्हस्के वस्ती, कळस येथील नाल्यावरील कल्व्हर्टची
साफसफाई करण्यास तसेच नाल्यांची खोली वाढविण्याचे आदेश देण्यात आले. पालखी मार्गावरील सर्व चेंबर्स तपासून चेंबर्सवर लोखंडी जाळी बसविणे, पावसाळी पाईप तपासून त्यासंबंधित कामे तातडीने करण्याचे सूचित करण्यात आले.
पुणे शहरातील पावसाळी चेंबर्सवरील कचरा त्याभागातील संबंधित सफाई
कर्मचाऱ्यांकडून काढण्याची व्यवस्था संबंधित क्षेत्रीय कार्यालयामार्फत करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी सर्व परिसराची २४ तास स्वच्छता ठेवण्याबाबत
सांगण्यात आले. घनकचरा विभागास स्वच्छतेसंबंधी सर्व सुविधा पुरविण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.