कॉंग्रेसच्या रक्तदान शिबिराला शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
: सरचिटणीस घनश्याम निम्हण यांचा उपक्रम
पुणे : रविवारी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शिवाजीनगर काँग्रेस भवन येथे, भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा मा श्रीमती सोनियाजी गांधी व मोहनदादा जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, त्याग, कर्तव्य या कार्यक्रमा अंतर्गत भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या निमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजक पुणे शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उद्योजक घनश्याम निम्हण यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत तब्बल ७६ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले. यावेळेस रक्तदात्यांना हेल्मेट व प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
: सोनिया गांधी आणि मोहन जोशी यांच्या वाढदिवसाचे निमित्त
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेशदादा बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहनदादा जोशी यांच्या प्रमुख उपस्थिततीत पार पडला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी सेल सरचिटणीस ज्योतीताई परदेशी, शिवाजीनगर मतदार संघातील, जेष्ठ नेते गोपाळदादा तिवारी, पुणेशहर ओबीसी सेल अध्यक्ष प्रशांत सुरसे, राजु नाणेकर, द स पोळेकर, दिपक ओव्हाळ, आशिष गुंजाळ, राहुल वंजारी, राजेंद्र शिरसाठ, संदिप मोकाटे, राजु साठे, राजाभाऊ कदम, सुमित डांगी, अविनाश बहिरट, सुरेश नांगरे, फैयाज शेख, मुख्तार शेख, संजय मोरे, .संदिप मोरे, जीवन चाकणकर, दत्ता जाधव, चंद्रशेखर कपोते तसेच बोपोडी ब्लाॅक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा.विठ्ठल आरूडे, मा.विजय सरोदे, मा.विनोद रणपिसे, मा.अनिल कांबळे, मा.प्रशांत टेके, मा.इंद्रजित भालेराव, मा.मैनुद्दीन अत्तार, माजी नगरसेवक मा.नंदलाल धिवार, सोशल मिडीया अध्यक्ष मा.मयुरेश गायकवाड, अल्पसंख्याक सेल विभाग काँग्रेस कमिटी बोपोडी अध्यक्ष मा.साजिद शेख, व मागासवर्ग पुणेशहर अध्यक्षा सौ सुंदरताई ओव्हाळ, बोपोडी ब्लाॅक काँग्रेस प्रभाग क्रमांक ८ च्या अध्यक्षा सौ शोभाताई आरूडे, सौ अक्तरी शेख भाभी, सौ पपिताताई सोनवणे, पुणेशहर सेवादल काँग्रेस कमिटी संघटीका सौ नीता कदम, सौ नाणेकर ताई, सर्व आदरणीय मान्यवर मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी, काँग्रेस कार्यकर्ते व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आलेल्या सर्व आदरणीय मान्यवर, नागरीक, कार्येकर्ते व बंधु भगिनीनचे अभिनंदन व आभार आयोजक पुणे शहर-जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उद्योजक घनश्याम निम्हण यांनी मानले.
COMMENTS