आमचं राजकारण हे नकलांवर आधारित नाही!
: संजय राऊत यांचा पलटवार
पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची नक्कल केल्यानंतर आता संजय राऊत यांनी देखील पलटवार केला आहे. राऊत म्हणाले, आमचं राजकारण हे नकलांवर आधारित नाही. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, येथे डुप्लिकेट नकली काही नाहीये जे खरं असेल ते परखडपणे बोलणार. कर नाही त्याला डर कशाला ?
राऊत पुढे म्हणाले, आम्हाला ईडीने बोलावलं म्हणून आम्ही गप्प नाही बसलो, बोलत राहिलो आम्हाला कोणाची भीती नाहीये आणि यापुढेही बोलतच राहू.
पुण्यातील सभेत बोलताना राज ठाकरे यांनी असा आरोप केला होता कि मुख्यमंत्री आजारी आहेत म्हणून पालिका निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्याला ही राऊत यांनी उत्तर दिले आहे. राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे हे आजारी असतानाही सक्रिय,काही माणसं आजारी नसतानाही सक्रिय नसतात.
COMMENTS