खाजगी रुग्णालयांत कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड ठेवण्याचे आदेश द्या
: शिवसेना गटनेता पृथ्वीराज सुतार यांची आयुक्तांकडे मागणी
: आंदोलन करण्याचा इशारा
सुतार यांच्या पत्रानुसार पुणे शहरामध्ये कोरोनाचे संकट पुन्हा वाढले असून , साधारण रोज सहा हजाराच्या आसपास पॉझिटिव्ह रुग्णांची ( Positive Patients) संख्या पोहोचली आहे. ज्या रुग्णांना उपचारांची गरज आहे असे रुग्ण जेव्हा खाजगी रुग्णालयांमध्ये अॅडमिट होण्यासाठी जातात तेव्हा त्यांना खाजगी रुग्णालयांमध्ये अॅडमिशन मिळत नाही. खाजगी रुग्णालयांकडून त्यांना आम्ही कोरोनासाठी बेडस ठेवले नाहीत असे सांगितले जाते. आपल्या मनपाच्या डॅशबोर्डवरती उपलब्ध बेड्सची संख्या रुग्णालयाचे नाव दाखबिले जाते. त्याप्रमाणे रुग्णांचे नातेवाईक संबंधित रुग्णालयांमध्ये गेल्यावर त्यांना परत पाठविले जाते. यामुळे नातेवाईकांना व रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महापौर यांनी घेतलेल्या पक्षनेत्यांच्या कोरोना आढावाच्या बैठकीमध्ये प्रशासनाकडून खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड ठेवले आहेत. असे सांगितले होते. परंतु प्रत्यक्षामध्ये परिस्थिती वेगळी आहे.याचा अर्थ प्रशासनाने अजूनही या कोविडच्या परिस्थितीला गांभीर्याने घेतलेले दिसत नाहीत. आपण त्वरीत सर्व खाजगी रुग्णालयांबाबत कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड ठेवण्याबाबत आदेश काढावेत. जी रुग्णालये आदेशाचा भंग करतील,त्यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा “शिवसेना ” पक्षामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा सुतार यांनी दिला आहे.
COMMENTS