अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने १०० मान्यवरांचा सन्मान
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने मान्यवरांचा सन्मान सोहळा सुरेंद्र पठारे फाऊंडेशनच्या माध्यमातून पार पडला.
येरवडा येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कला रंगमंदिर याठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमात मातंग समाजातील डॉक्टर, वकिल, शिक्षक पत्रकार व विविध क्षेत्रातील अधिकारी अशा १०० व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
मातंग समाजातील उच्च पदावर कार्यरत असणाऱ्या सन्मानित व्यक्तींचा आदर्श घेऊन आपलीं शैक्षणिक व वैचारिक वाटचाल तरूणांनी करावी असे मत यावेळी सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे संस्थापक सुरेंद्र पठारे यांनी मांडले.
यावेळी माजी आमदार जगदीश मुळीक, माजी आमदार बापूसाहेब पठारे, सुरेंद्र पठारे, डेक्कन कॉलेज पुरातत्व विभागाने प्रमुख डॉ. पांडुरंग साबळे, अण्णा धगाटे, अरूण अष्टूळ, सुभाष तोंडारकर, राजेंद्र दनके, डॉ उज्वला हातागळे व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. गंगाधर रासगे यांनी केले. आप्पासाहेब जाधव यांनी आभार मानले.