पुणे महापालिकेत उभारणार क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र!
: नगरसेविका अर्चना तुषार पाटील यांच्या प्रस्तावाला पक्षनेत्यांच्या बैठकीसह मुख्य सभेची मान्यता
पुणे : क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र पुणे महानगर पालिकेच्या नवीन इमारती मध्ये उभारण्यात येणार असून या तैलचित्राचा संपूर्ण खर्च नगरसेविका अर्चना तुषार पाटील करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
आद्यक्रांतीकारक लहुजी वस्ताद साळवे हे भारतीय क्रांतिकारक होते. लहुजी साळवे यांचे वडील राघोजी साळवे अतिशय पराक्रमी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात लहुजींचे पूर्वज पराक्रम गाजवीत. अशा वीर पराक्रमी थोर महापुरुष आद्यक्रांतीकारक लहूजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र पुणे पालिकेत उभारण्यात यावे. त्यांचा इतिहास नागरिकांना कळवा असा प्रस्ताव नगरसेविका अर्चना पाटील यांनी दिला होता. या प्रस्तावाला पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये एक मताने मंजुरी मिळाली. त्यांनतर तत्काळ हा विषय मुख्य सभेत देखील दाखल करण्यात आला आणि मुख्य सभेची देखील या प्रस्तावाला मान्यता मिळाली. त्यामुळे लवकरच हे तैलचित्र लागणार आहे.
आद्यक्रांतीकारक लहूजी वस्ताद साळवे यांचे तैलचित्र नवीन इमारती मध्ये उभारण्यात येणार आहे. याचा मला जास्त आनंद होत आहे. या तैलचित्रामुळे लहूजी वस्ताद साळवे यांचा ईतिहास सामान्यांना माहिती होईल. अनेक अनेक तरुणांना विद्यार्थ्यांना तैलचित्रामुळे माहिती मिळेल. हा प्रस्ताव मंजूर केल्याबद्दल मी पक्षनेत्यांचे मनापासून आभार मानते.
COMMENTS