आता पुणे महापालिकेत येताना जरा काळजीच घ्या!
: नागरिक, पत्रकार, राजकीय पक्ष, मनपा कर्मचारी यांच्यासाठी नियमावली
: महापालिका आयुक्तांचे आदेश जारी
पुणे : पुणे महापालिकेने किरीट सोमय्या प्रकरणापासून चांगलाच धडा घेतला आहे. महापालिका आपली सुरक्षा व्यवस्था आता अगदी चोख ठेवणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी एक नियमावली जारी केली आहे. नागरिक, पत्रकार, राजकीय पक्ष, मनपा कर्मचारी यांच्यासाठी ही नियमावली असेल. त्याचे पालन आता सर्वांनाच करावे लागणार आहे.
: अशी आहे नियमावली
पुणे महानगरपालिकेच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे (सर्व मनपा इमारती, शाळा, दवाखाने, उद्याने, इत्यादी ठिकाणी) रक्षण करणेसाठी सुरक्षा विभागामार्फत सुरक्षा व्यवस्था पुरविली जाते. त्याकरीता सुरक्षा जमादार, सुरक्षा रक्षक आणि खाजगी बहुउद्देशिय कामगार यांच्या नेमणुका पुणे महानगरपालिकेच्या विविध ठिकाणी करण्यात आल्या आहेत.
सुरक्षा व्यवस्थेच्या अनुषंगाने करावयाच्या अंमलबजावणीबाबत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी,
– महानगरपालिका भवनाच्या आवारामध्ये कोणतेही आंदोलन/निदर्शने करण्यास प्रतिबंधीत करण्यात येत आहे. याबाबत योग्यती दक्षता सुरक्षा विभागाने घ्यावी.
– महानगरपालिकेच्या सार्वजनिक/साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी संबंधीत खात्याचे परवानगी शिवाय कोणासही मनपा भवनामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच सार्वजनिक/साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी राजकीय पक्षाचा काही कार्यक्रम असल्यास त्याबाबत लेखी पुर्व सुचना महापालिका प्रशासनास देणे आवश्यक राहील.
– महानगरपालिकेच्या सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन कामकाज करित असताना ओळखपत्र परिधान करणे/वापर करणे सक्तीचे करणेत येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या सर्व
कर्मचाऱ्यांना नागर वस्ती विभागाकडील प्रवेश व्दार व दुमजली दुचाकी पार्किग प्रवेश व्दाराने प्रवेश देण्यात यावा.
कर्मचाऱ्यांना नागर वस्ती विभागाकडील प्रवेश व्दार व दुमजली दुचाकी पार्किग प्रवेश व्दाराने प्रवेश देण्यात यावा.
– महानगरपालिकेच्या सर्व मा. नगरसेवक/माजी नगरसेवक/स्वीकृत सभासद यांचेसाठी स्वतंत्र ओळखपत्रांची सुविधा नगर सचिव कार्यालयामार्फत करणेत यावी.
– महानगरपालिका भवनामध्ये कार्यालयीन कामासाठी आलेल्या नागरिकांना इमारतीमध्ये प्रवेश देताना त्यांचेकडील फोटो असलेले ओळखपत्र (उदा. पॅनकार्ड, आधारकार्ड, लायसन्स, मतदान ओखळ पत्र, संस्थेचे ओळखपत्र, इ.) तपासून प्रवेशद्वाराजवळ ठेवण्यात आलेल्या नोंद वहीतयेताना व जाताना सुरक्षा रक्षकांनी नोंद करुन अथवा पावती देवून मुख्य इमारतीच्या मनता हॉटेल नजिकच्या प्रवेशद्वारातूनच प्रवेश देण्यात यावा.
- महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये वेळोवेळी होणान्या सभांसाठी वारंवार येणाऱ्या पत्रकारांना जनता संपर्क अधिकारी यांचे कार्यालयामार्फत ओळखपत्र देणेची कार्यवाही करावी.
– नागरिक अथवा व्यक्ती ज्या खात्यामध्ये कामासाठी आलेला आहे. तेथील मनन अधिकारी/कर्मचारी यांनी भेट घेण्याबद्दल त्यांचेकडे गेटपास (प्रवेश पत्र) मागणी करणे आवश्यक असून, नागरिकांकडे गेटपास (प्रवेश पत्र) नसल्यास, त्यास गेट पास घेण्याची विनंती करावी.
– नागरिकांचे काम पूर्ण झाल्यास/नागरिक मनपा बाहेर जाण्यापूर्वी संबंधित अधिकारी यांनी का नागरिकाकडे असलेल्या गेटपासवर सही, पदाचा शिक्का व कार्यालय सोडण्याची वेळ, गेटपास संबंधित नागरिकास देण्यात यावा.
सदरची कार्यपध्दती मनपाच्या क्षेत्रिय कार्यालय प्रशासकीय कार्यालयामध्ये राबविण्यात यावी.
– महानगरपालिकेच्या आवारात प्रवेश करणाऱ्या चार चाकी वाहनांची तपासणी करुन वाहना द्यावा.
– सर्व खातेप्रमुख/विभागप्रमुख यांनी त्यांचे अखत्यारित असलेल्या सर्व सुरक्षा कर्मचारी यांचेदर प्रत्यक्ष नियंत्रण ठेवून सुरक्षेच्या कामकाजाबाबत योग्य ते आदेश देणे तसेच प्रवेशद्वारावर उसे राहण्याचे सक्त आदेश देण्यात यावेत.
– खातेप्रमुख/विभागप्रमुख यांनी त्यांचे खात्याकडे उपलब्ध करून दिलेल्या सुरक्षा का कामकाजाबाबत कसूर केल्यास तसेच आदेश न पाळणाऱ्या सुरक्षा रक्षक सेवकांवर मुख्य सुरक्षा अधिकारी यांचेमार्फत कारवाई करावी.
– सुरक्षा व्यवस्थेचे काम अखंडीत व सुरळीतपणे होणे करीता सुरक्षा रक्षक सेवकांना त्यांच्या इतर कामे न करुन घेणे बाबत खातेप्रमुख/विभागप्रमुख यांचे स्तरावर दक्षता घेण्यात यावी.
COMMENTS
प्रेस नोट,
दि. ०३/०३/२०२३.
मा. संपादक साहेब पत्रकार साहेब नमस्कार
कृपया
आमचे मत आपले लोकप्रिय वृत्तपत्रातून प्रसिद्ध करावी ही विनंती.
मनपा आयुक्तांचा आदेश भ्रष्ट्राचाराला निमंत्रण देणारा अत्यंत चुकीचा निर्णय.. विठ्ठल पवार राजे.
महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार साहेब यांनी सर्वसामान्य नागरिकांना महानगरपालिके मध्ये प्रवेश करूच नयेत याकरता काढलेला हा नवीन फंडा आहे.
आयुक्तांचा अत्यंत चुकीचा दुर्दैवी व सर्व सामान्य नागरिक हा मनपाचा खऱ्या अर्थाने मालक असून तो महापालिकेला मिळकत कर देतो आणि त्याच व्यक्तीला जर तुम्ही अशा प्रकारे जर आडढून त्याचं काम थांबवणार असाल किंवा त्याच्या कामात व्यत्यय आणून प्रतिबंध करण्यात मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरून केलेला खेळ आहे. तो खेळ जास्त दिवस चालणार नाही .! सर्व सामान्य नागरिकांना अडवून एक प्रकारची केलेली विनाशकाले विपरीत बुद्धि अशा प्रकारचा हा मनपाने , मनपा आयुक्तांनी घेतलेला निर्णय आहे.
हा सर्वसामान्य नागरिकांना मान्य होणार नाही कारण सर्वसामान्य नागरिक हा महिन्यातून वर्षातून किंवा कधीतरी एकदा तो त्याच्या कामाकरता त्याठिकाणी येणार आहे. मात्र दररोज येणारे नगरपालिका नगरसेवक, माजी नगरसेवक, विकृत एजंट, स्विकृत नगरसेवक, नाकृत नगरसेवक, त्यांचे पिऊ, चमचे डमचे, बिल्डरांचे शेठजी, भटजी, इंजिनिअर यांचे कडे मनपाचे सिक्युरिटी काहीही मागणी करणार नाहीत! कारण तै हाप्तेवाले आहे.
उलट ते आलेकी सिक्युरिटी शेपूट घालून उभे राहतील, सलाम करतील.
आणि सर्व सामान्य नागरिकांना मात्र नाहक फालतु केलेले
कायद्याच्या खाली ऊग्रट त्रास देतील.! किरीट सोमय्या आले लफडेवाले लफडे करुन गेले, आणि आयुक्तांचा त्रास मात्र सर्व सामान्य पुणे कर नागरीकांना. आणि पुणे मनपा आयुक्त यांनीच हा आदेश काढून आंदोलन नाला खतपाणी घातले आहे.
म्हणून म्हंतो आहे पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांचा निर्णय हा भ्रष्टाचार ला खतपाणी घालणारा आहे.
पुणे मनपा त्यासाठी नवीन नियमावली करावी सामान्य नागरिकाला जर आयुक्ताला भेटायचं असेल तर आयुक्तांनी तत्काळ त्या नागरिकाला भेट दिली पाहिजे जर आयुक्ताला पुणे मनपाचे कार्यालयात नागरीकांचा वास येत असेल, त्रास होत असेल तर, आयुक्त विक्रम कुमार यांनी स्वतःहून खुर्चीवरुन उतरून त्या नागरिकांची भेट घेऊन त्याचं काम समजून घेतलं पाहिजे.
महानगरपालिके मध्ये येणारा व्यक्ती त्याचे काम वाॅर्ड मधे होत नाही, त्याला त्रास होतो म्हणून मनपात येतो.? आणि त्या नागरीकाची तक्रार जागच्याजागी निपटारा झाला तर तो महानगरपालिकेमध्ये कधीही येणार नाही! कारण त्याला तितका फालतू वेळ नसणार आहे.
त्यामुळे नगरपालिका महानगरपालिका पुणे, महानगरपालिकेचे विक्रमकुमार आयुक्त साहेब हे स्वतःला जरी राजा समजत असले तरी त्यांना प्रजा म्हणून आम्ही रस्त्यावर येऊन जनतेची कामे करायला भाग पाडू हे त्यांनी त्यांचे डोक्यात निट ठेवावे.आणि सर्वसामान्य नागरिकांना मनपाचे कार्यालयात येण्या साठी आडकाठी केली तर पुणे मनपा हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांचे कामाबाबत पुणे मनपा हद्दीतील सर्वसामान्य नागरिकांचे कामाबाबत पुणे मनपाचे आयुक्तांचे घरी कामा सांगायला शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना जायाला मागे पुढे पाहणार नाही याची नोंद पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार यांनी डोकं ठिकाणावर ठेवून काम करावे.
सौ बिमारी की दवा है किसान, जय किसान.
आपला स्नेहांकित किसान सेवक.
विठ्ठल पवार राजे.
प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक, शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य.
आपल्या अभिप्राय बद्दल आम्ही आभारी आहोत.
ramesh khamkar 9822969610