बालेवाडीत 7 एकरवर उभारणार खुले मैदान
: नगरसेवक अमोल बालवडकर यांनी कामाला केली सुरुवात
पुणे : बालेवाडी हाय स्ट्रिट येथील स.नं.१७ मध्ये मुलांसाठी व नागरीकांकरीता लवकरच बाणेर-बालेवाडी परिसरातील सर्वात मोठे खुले मैदान उपलब्ध होणार आहे. 7 एकर जागेवर हे भव्य मैदान उभारले जाईल. मैदान विकसित करण्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे. अशी माहिती नगरसेवक अमोल बालवडकर यांनी दिली.
: महापालिका बजेट मध्ये करून घेणार तरतूद
याबाबत नगरसेवक अमोल बालवडकर यांनी सांगितले कि, बालेवाडी हायस्ट्रिट येथील स.नं.१७ मधील आरक्षित जागेवर खेळाडु, मुले व नागरीकांकरीता खुले मैदान विकसित करण्याच्या कामाला प्रत्यक्षात आम्ही सुरुवात केली आहे. माझ्याच मार्गदर्शनाखाली सदर जागा मोकळी करुन सपाट करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. हे मैदान 7 एकर जागेवर उभारले जाणार आहे. त्यासाठीची 90% जमीन महापालिकेच्या ताब्यात आली आहे. बालवडकर यांनी सांगितले कि जमीन ताब्यात घेण्यासाठी जागा मालकासोबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. यासाठी आता महापालिका बजेट मध्ये योग्य ती तरतूद करून घेतली जाणार आहे. जेणेकरून या कामास गती मिळेल.
प्रामाणिक काम, विकासावर ठाम..!
हे मैदान 7 एकर जागेवर उभारले जाणार आहे. त्यासाठीची 90% जमीन महापालिकेच्या ताब्यात आली आहे. जमीन ताब्यात घेण्यासाठी जागा मालकासोबत वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला आहे. यासाठी आता महापालिका बजेट मध्ये योग्य ती तरतूद करून घेतली जाणार आहे.
COMMENTS
खूप छान ..हार्दिक अभिनंदन पण ..खूप छान कार्य होता आहेत आपल्या हातून..
खूप छान ..हार्दिक अभिनंदन पण ..खूप छान कार्य होता आहेत आपल्या हातून..