NCP : Prashant Jagtap : Agitation : अमित शहा चाले जाव, च्या  घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आंदोलन : महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे  धोरण : प्रशांत जगताप

HomeBreaking Newsपुणे

NCP : Prashant Jagtap : Agitation : अमित शहा चाले जाव, च्या  घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आंदोलन : महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे  धोरण : प्रशांत जगताप

Ganesh Kumar Mule Dec 19, 2021 7:31 AM

Mohan Joshi : अमित शहा यांची पुणे भेट म्हणजे भाजपच्या पराभवाची कबुली : माजी आमदार मोहन जोशी यांची टीका 
Deepali Dhumal : PMC : महापालिकेच्या चांगल्या कार्यक्रमापासून दूर ठेवले : सत्ताधाऱ्यांचे गलिच्छ राजकारण  : विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांचा आरोप 
Chandrakant Patil Vs Shivsena : भविष्यात सर्व हिशोब चुकते होणार! : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा शिवसेनेला इशारा : किरीट सोमय्या हल्ल्याप्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र

अमित शहा चाले जाव, च्या  घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे आंदोलन

: महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे  धोरण : प्रशांत जगताप

पुणे : अवघ्या देशाचे आराध्य दैवत, महाराष्ट्राची अस्मिता युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात विटंबना करण्यात आली. भाजप नेते अमित शहा यांना निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे महानगरपालिकेत आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आला. प्रत्यक्षात चौकाचौकात लावलेल्या बॅनरवर छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न लावता अमित शहा, नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या अनेक किरकोळ नेत्यांचे फोटो लावण्यात आले. जिथे संधी मिळेल तिथे महापुरुषांचा जाणूनबुजून अवमान करण्याचे भारतीय जनता पक्षाचे हे धोरण आहे, याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जंगली महाराज रस्त्यावरील झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घालून वंदन करण्यात आले. अशी माहिती शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

 

कर्नाटक राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली, याबद्दल प्रतिक्रिया देताना ही घटना “किरकोळ” आहे असे वक्तव्य भाजप नेते व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. अवघ्या महाराष्ट्रासाठी छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय आहेत, छत्रपतींच्या अवमानाची घटना आज भारतीय जनता पक्षाला “किरकोळ” वाटत आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी याचे चोख प्रत्युत्तर मतपेटीच्या माध्यमातून निश्चितच देतील. येत्या काळात या शिवद्रोही भाजपचे महाराष्ट्रातील अस्तित्व ‘किरकोळ’ झाल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाही. नरेंद्र मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानकारक भाषा वापरणे यांसारखे अनेक प्रकार यापूर्वीही भाजपकडून करण्यात आले आहेत. यावरूनच भाजपचे शिवप्रेम किती खोटे आणि दिखाऊ आहे हे सिद्ध होते. आताही कर्नाटकातील घटनेबद्दल राज्यातील सर्व भाजप नेते मूग गिळून बसले आहेत. देवेंद्र फडणवीस यांची छत्रपती शिवाजी महाराजांवर खरी श्रद्धा असती तर क्षणाचाही विलंब न करता त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला असता, परंतु त्यांनी तसे केले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानापेक्षा फडनवीसांना त्यांची पक्षनिष्ठा महत्वाची वाटली अशी भावना यावेळी प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

या आंदोलनप्रसंगी शहराध्यक्ष श्री.प्रशांत जगताप,महिला शहराध्यक्ष सौ.मृणालिनीताई वाणी,प्रदेश प्रतिनिधी श्री.प्रदीप देशमुख,सौ.रुपालीताई ठोंबरे पाटील,राकेश कामठे,अल्पसंख्यांक शहराध्यक्ष समीर शेख,मनाली भिल्लारे,महेश हांडे आदींसह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 1
  • comment-avatar

    महापुरुषांच्या नावाने मतं मागायची आणि त्यांचे पुतळे उभा करताना त्यांची प्रतिमा पत्रिके वरती न छापणे हा जाणीवपूर्वक केलेले कृत्य आहे त्या कृत्याचा निषेध करणे व्यवहार्य आहे तसेच बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे हा देखील एक प्रकारचा द्रव असून जनतेचे लक्ष विचलित करणे अशा प्रकारचं कारस्थान केंद्र आणि कर्नाटक सरकारकडून जर केले जात असेल तर त्याला केवळ हे सरकार, पुणे मनपा प्रशासन जबाबदार आहे.
    अता जनता त्याचे उत्तर देईल त्यामुळे त्यावर जास्त भाष्य करणं हे योग्य ठरणार नाही जनता यांना निवडणुकीमध्ये उत्तर देईल.
    जय किसान जय भारत.

DISQUS: 0